

अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा
मुंबई ३.० आणि चौथ्या मुंबईची घोषणा
वाढवण येथे चौथी मुंबई विकसित करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात मुंबईसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई ३.० आणि मुंबई ४ ची घोषणा करण्यात आली आहे.मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात मुंबई ३.० आणि चौथी मुंबई विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं? (Mumbai 3.0 Announcement)
मुंबई ३.० (Mumbai 3.0)
अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावासेवा परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येईल. याअंतर्गत कर्नाळा, साई, चिर्णे, रायगड, पेण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्रे ग्रीनफील्ड क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. या भागात मुंबई ३.० विकसित करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
मुंबई ४ (Fourth Mumbai)
वाढवण जिल्हा पालघरजवळ चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजित आहे. लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंगसाठी नवीन प्रकल्प सुरु करण्यात येतील. झोपडपट्टी पुनर्वसनमार्फत ३० लाख झोपडपट्टीधारकांच्या पुनर्विकासासाठी गृह आराखडा तयार करण्यात येत आहे. एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार आहे.मुंबईच्या आजूबाजूला मुंबई ३.० आणि चौथी मुंबई विकसित करण्याचे सरकारे उद्दिष्ट आहे. यासाठी प्रकल्प हाती घेण्यात येतील. मुंबईत कुठेही अनधिकृत बांधकाम होऊ नये, यासाठी रोडमॅप तयार केला जाणार आहे.
बुलेट ट्रेनचं काम
बुलेट ट्रेनची तीन स्थानकाच 2027 पर्यंत पुर्ण हेईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणार आहे. त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.