India Issues Nationwide Alert  Amid Iran–US–Israel Conflict
Security tightened across India after the Home Ministry issued an alert amid escalating Iran–US–Israel conflict and rising Middle East tensions.saam tv

US-इस्रायलविरुद्ध इराण युद्धामुळे भारतात अलर्ट; गृह मंत्रालयाचं सर्व राज्यांना पत्र, पुण्यात वाढवली गस्त

India Issues Nationwide Alert Amid Iran–US–Israel Conflict : इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील तणाव वाढल्यानंतर भारताने देशभरात सुरक्षा सतर्कता इशारा जारी केला आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Published on
Summary
  • मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे जागतिक तणाव वाढला आहे.

  • स्ट्रेट ऑफ हॉर्मुज हल्ल्यानंतर भारताने सुरक्षा अलर्ट जारी केला.

  • गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.

इराणविरुद्ध इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. अमेरिका इस्रायल तेहरानसह अनेक बड्या शहरात सातत्याने बॉम्ब हल्ले करत आहे. इराणसुद्धा अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. याच दरम्यान स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये एका जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. युद्धामुळे जगभरात दहशत पसरली आहे. त्याचदरम्यान भारत सरकारच्या गृह मंत्रालयानेही सर्व राज्यांना पत्र लिहून अलर्ट केले आहे.

अमेरिका आणि इस्रालयच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराण बदला घेण्याच्या मानसिकतेत आहे. इराणकडून अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांवर हल्ले केले जात आहेत. दुबई, सौदी अरेबिया, इराण, इस्रायलमधील भारतीय लोकांना सावधगिरी बाळगण्याचे सूचना भारत सरकारने दिल्या आहेत. त्याचदरम्यान भारतातही केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवत अलर्ट राहण्याचे आदेश दिलेत.

India Issues Nationwide Alert  Amid Iran–US–Israel Conflict
पश्चिम-आशियामधील युद्ध पेटणार! ओमानमध्ये तेल टँकरवर ड्रोन हल्ला, एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू

केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, इराणवर अमेरिका आणि इस्रायल हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात हिंसाचार उफाळून येऊ नये यासाठी सतर्क राहावे. २८ फेब्रुवारीला हे पत्र प्रसारित केले होते. ज्यात राज्यांना भडकाऊ भाषण देणाऱ्या इराणी कट्टर समर्थकांची ओळख पटवा, असं सांगितले होतें. या पत्रात मध्य पूर्व आशियात सुरू असणाऱ्या युद्धानंतर भारतातील अनेक भागात होणाऱ्या विरोध प्रदर्शनाबाबत सतर्क केले. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाबाबतही पत्रात उल्लेख करण्यात आलाय.

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतात रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांमुळे सरकारने खबरदारीचे पाऊल उचललंय. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आलेत. ज्या भागात लोकांनी उतरून खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल आक्रोश केला त्या लाल चौकातील परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला. क्लॉक टॉवरच्या आसपासही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आलीय.

सोबतच शाळा आणि कॉलेज पुढील २ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये खामेनेई यांच्या मृत्यूमुळे ४० दिवसांचा दुखवटा पाळण्यात येत आहे.

India Issues Nationwide Alert  Amid Iran–US–Israel Conflict
Israel-Iran War: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे पश्चिम आशियात अडकले महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक; यादी आली समोर, कोण-कोणत्या जिल्ह्यातील आहेत पर्यटक?

इराण आणि अमेरिकेतील तणाव खूप वाढला आहे. इराण यापुढे अमेरिकेशी चर्चा करण्यास तयार नाही असं इराणी अधिकाऱ्याने म्हटल्याचे पीटीआयने सूत्राच्या हवाल्याने बातमी दिली आहे. अमेरिका इराणच्या नवीन नेतृत्वाशी बोलण्यास तयार आहे, असं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले होते. मात्र इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी 'एक्स' वर कडक इशारा दिलाय. 'आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करणार नाही. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इस्रायलने रविवारी इराणमधील अनेक ठिकाणी जोरदार हल्ले केलेत.

Pune पोलिस सतर्क, संवेदनशील भागात गस्त वाढवली

अमेरिका व इराण युद्धाचा तणाव वाढला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिस सतर्क झाले आहेत. पुणे शहरात इराणी विद्यार्थी तसेच नागरिकांची संख्या मोठी आहे. काही भागात इराणी वस्त्या आहेत. यामुळे विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी संपर्क साधत संवेदनशील पार्श्वभूमी असलेल्या परिसरांमध्ये गस्त वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com