Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! २ लाख गुंतवा अन् ₹९०,००० व्याज मिळवा

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळणार आहे. २ लाखांवर तुम्हाला ९०,००० रुपयांपर्यंतचा परतावा मिळणार आहे.
Post Office Scheme
Post Office SchemeSaam Tv
Published On

जर तुम्हाला भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आतापासूनच गुंतवणूक करायची आहे. तुम्ही चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणी येत नाही. जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करा. या योजनेत २ लाख रुपये गुंतवल्यावर ९०,००० रुपयांपर्यंतचा परतावा मिळणार आहे.

Post Office Scheme
Ladki Bahin Scheme: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार २१०० रुपये, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणतीही रिस्क नाही. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत सध्या ७.५ टक्के व्याज मिळते. जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा हवा असेल तर या योजनेत नक्की गुंतवणूक करा.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करु शकतात. १ वर्ष,२ वर्ष,३ वर्ष किंवा ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत कालावधीनुसार व्याजदरदेखील वेगवेगळे आहे. जर तुम्ही १ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ६.९ टक्के व्याज मिळते. २ किंवा ३ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७ टक्के, ५ वर्षांसाठी गुंतवणूकीवर ७.५ टक्के गुंतवणूक करु शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ५ वर्षासाठी गुंतवणूक केली तर चांगलं व्याज मिळणार आहे. तुम्हाला २ लाख रुपये गुंतवायचे आहे. यामध्ये ५ वर्षांसाठी ७.५ टक्के यानुसार तुम्हाला २,८९,९९० रुपये मिळणार आहे. तुम्हाला जवळपास ९०,००० रुपये व्याज मिळणार आहे. त्यामुळे व्याजातून जवळपास लाखो रुपये मिळणार आहेत.

Post Office Scheme
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना... ५ वर्षात फक्त व्याजातून मिळणार १० लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्हाला कलम 80C अंतर्गत व्याजदरात सूट मिळते. तुम्ही कमीत कमी १००० रुपये भरुन अकाउंट उघडू शकतात. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला व्याजासहित पैसे मिळणार आहेत.

Post Office Scheme
Government Scheme: लाडकीसाठी फडणवीस सरकारची खास योजना, तब्बल ३०० कोटींची तरतूद; मिळणार आता १० लाखांपर्यंत कर्ज, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com