करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Investment Plan: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) हा निवृत्ती नियोजनासाठी एक सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणूक पर्याय आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून जवळजवळ १ कोटींचा निधी उभारू शकता.
Investment Plan:
Disciplined long-term PPF investment can help you build a ₹1 crore retirement corpus and secure steady monthly income.Saam tv
Published On
Summary
  • पीपीएफ ही सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणूक योजना आहे.

  • दीर्घकालीन शिस्तबद्ध गुंतवणुकीतून १ कोटींचा निधी तयार होऊ शकतो.

  • तयार निधीतून दरमहा सुमारे ₹61,500 पेन्शन मिळू शकते.

देशातील अनेक लोकांसाठी रिटायरमेंट प्लानिंग हे अधिक परतावा मिळवणे नसून तर एक सुरक्षित आणि करमुक्त उत्पन्नाचा मार्ग निर्माण करणे असतो. त्यामुळे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) हे एक खास पर्याय आहे. डिसिप्लिन्ड इन्वेस्टमेंट आणि दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास जवळपास १ कोटी रुपयांचा परतावा मिळतो. तर दरमहा 61,500 रुपयांचे पेन्शन मिळेल.

Investment Plan:
PM Kisan 22nd Instalment: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये येणार? PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

पीपीएफ ही गेल्या अनेक दशकांपासून भारतातील सर्वात लोकप्रिय दीर्घकालीन बचत योजनांपैकी एक बनले आहे. ही योजना सरकार सपोर्टेड आहे. हे सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. या योजनेतील गुंतवणूकदार कलम 80C (जुन्या कर प्रणाली अंतर्गत) अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत. पीपीएफ परिपक्व झाल्यावर करमुक्त आहे. सध्या पीपीएचं वार्षिक व्याजदर 7.1 टक्के आहे. तसेच सरकार दर तीन महिन्याला दर निश्चित करत असतात, त्यात बदल करत असतात.

Investment Plan:
Gold Price Today: सोन्याला पुन्हा चकाकी, १० तोळे १९,१०० रुपयांनी महागले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

तरीही, इतर निश्चित उत्पन्न उत्पादनांच्या तुलनेत पीपीएफने सातत्याने चांगले परतावे दिले आहेत. मागी काही वर्षांमध्ये पीपीएफचे दर सुरूवातीच्या तुलनेत कमी झालेत. तरीही यातून गुंतवणूकदरांना 7.1 टक्के व्याज मिळते. करमुक्त - रूढीवादी गुंतवणूकदारांसाठी आकर्षक राहतो.

पीपीएफचे नियम

किमान गुंतवणूक: दरवर्षी 500 रुपये

जास्तीत जास्त गुंतवणूक: दरवर्षी 1.5 लाख रुपये

लॉक-इन कालावधी: 15 वर्षे

मुदतवाढ : कायमस्वरूपी 5 वर्षांच्या ब्लॉक्समध्ये

15 वर्षे पूर्ण केल्यानंतरही तुम्हाला गुंतवणूक सुरू ठेवण्याची असेल तर तुम्हाला मुदत संपण्याआधी एका वर्षाच्या आत फॉर्म एच सादर करणे आवश्यक आहे. पीपीएफमधील व्याज दर महिन्याला मोजले जाते (दर महिन्याच्या 5 तारखेनंतरच्या सर्वात कमी शिल्लक रकमेवर), दरवर्षी चक्रवाढ होते आणि ते आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा होत असते.

पीपीएफमध्ये 1 कोटीचा निधी कसा उभारायचा?

या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक ₹1.5 लाख आहे, जर समजा तुम्ही दरवर्षी संपूर्ण रक्कम 7.1 टक्के व्याजदराने गुंतवत आहात. तर

वार्षिक गुंतवणूक- 1.5 लाख रुपये

व्याजदर- 7.1 टक्के

गुंतवणूक कालावधी: 15 वर्षांपेक्षा जास्त

कॉर्पस ग्रोथ

15 वर्षे: 40.68 लाख रुपये

20 वर्षे (पहिल्या 5 वर्ष वाढवल्यास): 66.58 लाख रुपये

25वर्षे (दुसरी 5 वर्षांची वाढवल्यास): 1.04 कोटी रुपये

म्हणून 1 कोटी रुपये गाठण्यासाठी, तुम्हाला 25 वर्षे गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल—म्हणजेच, सुरुवातीच्या 15 वर्षांच्या परिपक्वतेनंतर 10 वर्षे.

महिन्याला 61,500 रुपयांची पेन्शन

आता समजा 25 वर्षांनंतर तुम्ही हप्ते भरणं थांबवले आणि फक्त निधी पीपीएफमध्ये गुंतवले तर

एकूण निधी: 1.04 कोटी रुपये

अंदाजे व्याजदर: 7.1%

वार्षिक व्याज:

1.04 कोटी रुपयांपैकी 7.1 टक्के = प्रति वर्ष 7.38 लाख रुपये

मासिक व्याज उत्पन्न: 7. 38 लाख रुपये ÷ 12 = प्रति महिना 61,533 रुपये

ही रक्कम मासिक पेन्शन म्हणून विचारात घेतली जाऊ शकते, तर तुमची 1.04 कोटी रुपयांची मूळ रक्कम तशीच राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com