राज्याच्या राजकारणात गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची धाकधूक वाढवणारी मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेतून काही महिलांचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. एक मोठी चूक त्यांना महागात पडली आहे. महिला आणि बालविकास विभागाने या योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक केली होती. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना 31 डिसेंबर 2025 ही तारीख शेवटची दिली होती. या तारखेपूर्वी e-KYC पूर्ण न केलेल्या महिलांचे पैसे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना 1500 रुपये मिळणार नाहीये. त्यामुळे त्यांचा लाभ देखील बद होऊ शकतो.
मात्र ज्या महिलांनी e-KYC केली होती, पण त्यामध्ये चुकीचा पर्याय निवडला होता. त्यांना ही लाभ मिळत नव्हता, अशा महिलांसाठी आता ही शेवटची सुवर्णसंधी आहे. ई- केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली गेली आहे. महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ही आता लाभार्थी महिलांसाठी दुसरी आणि शेवटची संधी आहे. यानंतर अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाईल.
जर महिलांनी eKYC केली नसेल किंवा ती अपूर्ण असेल, तर त्यांनी आताच अधिकृत पोर्टलवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. चुकीच्या eKYC असलेल्या महिलांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी चूक दुरुस्ती करून घ्या, नाहीतर पैसे थांबवले जातील आणि मिळण्याची शक्यता कमी आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in तपासा किंवा जवळच्या आंगणवाडी किंवा सेतु केंद्राशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.