Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींची ई-केवायसी पुन्हा सुरू; २ प्रश्नांची उत्तरे अचूक द्या, मिळवा झटपट ४५०० रुपये

Ladki Bahin Yojana update : लाडक्या बहि‍णींची ई-केवायसी पुन्हा सुरू करण्यात आलीये. या योजनेसाठी २ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana updateSaam tv
Published On
Summary

सरकारकडून लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा

योजनेतील 'ई-केवायसी' प्रक्रिया पुन्हा सुरू होणार

लाभार्थींना दोन प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागणार

राज्यातील लाडक्या बहि‍णींना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी बंद केलेली लाभार्थी पडताळणी 'ई-केवायसी' प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही पडताळणी सुरू केल्याने महिलांना तीन महिन्यांचे एकत्रित पैसे मिळण्याची शक्यता आहे. यासाठी पात्र महिलांना केवळ दोन प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागणार आहे.

महिला बालविकास विभागाने लाभार्थी महिलांसाठी पुन्हा एकदा ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आलीये. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुर्बल महिलांना महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. महिन्याचा हा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलीये. अनेक महिलांनी मोबाईल नसणे, इंटरनेटचा अभाव, आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, ओटीपी न येणे यांसारख्या बाबींमुळे अनेक महिलांना प्रक्रिया योजनेचे पैसे मिळाले नव्हते. यंदा ई-केवायसी करताना दोन प्रश्नांची उत्तरे देताना योग्य उत्तरे द्यावीत.

लाडक्या बहि‍णींनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार क्रमांक टाकून ओटीपी टाकून लॉगिन करावे. तुम्हाला ओटीपी येत असल्यास तुम्ही योजनेत ई-केवायसीची दुरुस्ती करण्यास पात्र आहात. ईकेवायी पूर्ण करणाऱ्या लाभार्थी महिलांना डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित ४५०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana
कोळसा खाणीत भीषण स्फोट; 10 मजुरांचा मृत्यू, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी

कोणते प्रश्न विचारण्यात येतात?

A) माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का ?

B) माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानीवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे का?

योजनेअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे द्यावी लागणार आहे. दोन्ही प्रश्नांना दिलेली उत्तरे खरी असावीत. खोटी माहिती आढळल्यास कारवाईस पात्र राहील, अशी सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Ladki Bahin Yojana
PM मोदी-राहुल गांधी संसदेत भिडले? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

नेमकं काय करावं?

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे. त्यानंतर दोन प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसेल. तिथे जाऊन योग्य उत्तरे निवडावीत. उदा. तुमच्या सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त वेतन घेणारा सदस्य नसेल, तर तुम्ही 'नाही' हा पर्याय निवडू शकता. तुम्ही कोणत्याही प्रकारची चुकीची उत्तरे दिल्यावर तुम्हाला अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com