

gold rate today in India city wise prices : पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. देशांतर्गत सराफा बाजारात लागोपाठ दुसर्या दिवशी सोन्याचे दरात घसरले आहेत. स्पॉट सोन्याच्या किमती ५,००० डॉलर्सच्या खाली आल्या आहेत. ०.४३% घसरून ४,९९२ डॉलर्स प्रति औंस झाल्या आहेत. चांदीची किंमतही ३% घसरून ७४.२४ डॉलर्स प्रति औंसवर आली आहे. जागतिक बाजारातील दराचा परिणाम भारतामधील मार्केटवरही पडलाय. आज सराफा बाजार उघडातच सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १५३० रूपयांनी घसरली आहे. वाचा सोन्याचे आजचे ताजे दर काय आहेत...
२४ कॅरेट सोन्याचे दर काय ?
प्रति ग्रॅम - १५,४९१ - १५३ रूपयांनी स्वस्त
प्रति तोळा - १५४९१० - १५३० रूपयांनी स्वस्त
प्रति १० तोळा - १५४९१०० - १५३०० रूपयांनी स्वस्त
२२ कॅरेट सोन्याचे दर काय ?
प्रति ग्रॅम - १४,२०० - १४० रुपये कमी
प्रति तोळा - १,४२,००० - १४०० रुपये कमी
प्रति १० तोळा - १४,२०,००० - १४००० रुपये कमी
१८ कॅरेट सोन्याचे दर काय ?
प्रति ग्रॅम - ११,६१८ - ११५ रुपये स्वस्त
प्रति तोळा - ११,६१८० - ११५० रुपये स्वस्त
प्रति १० तोळा - ११,६१८०० - ११५०० रुपये स्वस्त
तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय ?
मुंबई, पुणे -
२४ कॅरेट - १५,४९१
२२ कॅरेट - १४,२००
१८ कॅरेट -११,६१८
दिल्ली -
२४ कॅरेट -१५,६५८
२२ कॅरेट - १४,३५४
१८ कॅरेट - ११,७४७
कोलकाता -
२४ कॅरेट - १५,४९१
२२ कॅरेट -१४,२००
१८ कॅरेट -११,६१८
चेन्नई -
२४ कॅरेट - १५,७५२
२२ कॅरेट - १४,४३९
१८ कॅरेट - १२,३४९
बंगळुरू -
२४ कॅरेट -१५,४९१
२२ कॅरेट -१४,२००
१८ कॅरेट -११,६१८
हैदराबाद -
२४ कॅरेट -१५,४९१
२२ कॅरेट -१४,२००
१८ कॅरेट - ११,६१८
(वरील सोन्याचे दर हे goodreturns संकेतस्थळावरील सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी ज्वेलरशी संपर्क साधा.)
जागतिक बाजारपेठेत मिश्र संकेतांमुळे सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सलगच्या सुट्ट्यांमुळे चीन, हाँगकाँग, सिंगापूर, तैवान आणि दक्षिण कोरियासह मोठ्या आशियाई बाजारपेठांमध्ये व्यवहार मंदावले आहेत. मजबूत अमेरिकन डॉलरचाही मौल्यवान धातूंच्या किमतींवर परिणाम झाला आहे. चांदी ३,३९१ रुपयांनी प्रति किलोने घसरून २,३६,५०० रुपयांवर आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.