कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकल्यानंतर आता कागलमध्ये हसन मुश्रीफांचं टेंशन वाढलंय. पवारांनी मुश्रीफांना धडा शिकवण्याची भाषा केल्यानंतर मुश्रीफांनी मात्र पवारांवर टीका करणं टाळलंय. मात्र त्यांच्याविरोधात तुतारी फुंकण्याची तयारी करणा-या समरजितसिंह घाटगेंवर जोरदार हल्ला चढवलाय. त्यामुळे आतापासूनच कोल्हापूरच्या राजकारणात रंगत आलीय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
कोल्हापूरच्या कागलमध्ये शरद पवारांनी डाव टाकला आणि भाजपचे समरजित घाटगेंनी विधानसभा निवडणुकीत तुतारी फुंकण्याची जोरदार तयारी सुरू केलीय. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफांसमोरील आव्हान वाढलंय. विशेष म्हणजे पवारांनी कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफांचं नाव न घेता लाचार असा उल्लेख करत त्यांना जागा दाखवणार असल्याचा निर्धार केला. त्यामुळे मुश्रीफांनीही घाटगेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. मात्र टीका करताना त्यांनी पवारांशी पंगा घेणं टाळलंय. मात्र घाटगेंनी पवारांनाच पुढे करून मुश्रीफांवर पलटवार केलाय.
एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले मुश्रीफ हे अजितदादा पवारांच्या गटात गेले. मुश्रीफ अजितदादांसोबत गेल्यामुळे त्यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे नेते समरजितसिंह घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे मुश्रीफ सावध झाले असून, आपण अल्पसंख्याक असल्याची आठवणही मुश्रीफांना झालीये. '
ईडी'च्या भीतीमुळे मुश्रीफ हे अजितदादांसोबत गेल्याच्या चर्चा उघडपणे झाल्यात. त्यामुळे शरद पवारांची साथ सोडल्याची किंमत येत्या निवडणुकीत आपल्याला मोजावी लागेल अशी भीती मुश्रीफांना जाणवत तर नाही ना ? त्यामुळेच मुश्रीफांनी शरद पवारांवर टीका करण टाळून घाटगेंविरोधात हल्लाबोल केलाय. त्यामुळे कागलमध्ये आतापासूनच निवडणुकीची रंगत सुरू झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.