Maharashtra Politics : हसन मुश्रीफ यांना दणका देण्यासाठी शरद पवारांचा मास्टर प्लान; कोल्हापुरात राष्ट्रवादीची मोठी खेळी

sharad pawar Political news : हसन मुश्रीफ यांना दणका देण्यासाठी शरद पवारांनी मास्टर प्लान आखला आहे. कोल्हापुरात शरद पवार गटाने मोठी खेळी आखली आहे. शरद पवार गटाच्या खेळीने हसन मुश्रीफ यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
हसन मुश्रीफ यांना दणका देण्यासाठी शरद पवारांचा मास्टर प्लान; कोल्हापुरात राष्ट्रवादीची मोठी खेळी
हसन मुश्रीफ यांना दणका देण्यासाठी शरद पवारांचा मास्टर प्लान; कोल्हापुरात राष्ट्रवादीची मोठी खेळीSaam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकारण तापू लागलं आहे. कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे नावे समोर येऊ लागले आहेत. कागल विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांचं नाव चर्चेत आहे. तर हसन मुश्रीफ यांना दणका देण्यासाठी शरद पवारांनी मास्टर प्लान आखल्याचीही जोरदार चर्चा आहे. कोल्हापुरातील कागलमध्ये समरजित सिंह घाटगे हे शरद पवार गटाच प्रवेश करून महाविकास आघाडीकडून निवणडणूक लढतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापुरातील भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांनी २३ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे.

समरजीत सिंह घाटगे हे मेळाव्यात कार्यकर्त्यांचा कौल घेऊनच पुढील राजकीय दिशा ठरवणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटांकडून आगामी विधानसभा लढविण्यास संदर्भात घाटगे यांच्याशी यापूर्वीच चर्चा केली आहे. कोल्हापुरात उद्या होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यानंतर समरजित सिंह घाटगे पुढील राजकीय दिशा ठरवणार असल्याची माहिती मिळत आहे.

हसन मुश्रीफ यांना दणका देण्यासाठी शरद पवारांचा मास्टर प्लान; कोल्हापुरात राष्ट्रवादीची मोठी खेळी
Kolhapur Breaking News: खळबळजनक! आंबा घाटात आढळले २ तरुणांचे मृतदेह; अपघात की घातपात? पोलिसांकडून तपास सुरु

कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ याना पुन्हा महायुतीकडून तिकीट मिळणार असल्यानं समरजीत सिंह घाटगे यांनी तुतारीची वाट धरल्याचं बोललं जात आहे. कागल मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवल्यास ताकद कमी पडण्याची शक्यता असल्यानेच समरजीत सिंह घाटगे यांची तुतारीच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याची चर्चा आहे.

हसन मुश्रीफ यांना दणका देण्यासाठी शरद पवारांचा मास्टर प्लान; कोल्हापुरात राष्ट्रवादीची मोठी खेळी
Chhatrapati Sambhajinagar News : न्याय मिळेना! स्वातंत्र्यदिनीच २ शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; कोल्हापूर, छ. संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मी समरजित सिंह घाटगे यांना अनेक वर्षे ओळखते. समरजित घाडगे हे युवा नेतृत्व आहे. त्यांचा संघर्ष मोठा आहे. राज्याच्या भल्यासाठी काही करत असेल तर स्वागत आहे.

'मी समरजित सिंह घाटगे यांच्यावर आरोप करत होते, याचा डेटा दाखवा मग बोलते', असेही सुळे पुढे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com