High Court: धर्मांतर थांबले नाही तर भारतातील बहुसंख्य जनता अल्पसंख्याक होईल, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

Allahabad High Court On Conversions: धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सामूहिक धर्मांतराला परवानगी दिल्यास भारतातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होण्याचा धोका आहे, असे मत हायकोर्टाने व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतर मोठ्याप्रमाणात होत आहे.
High Court: धर्मांतर थांबले नाही तर भारतातील बहुसंख्य जनता अल्पसंख्याक होईल, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता
Allahabad High Court On Conversionssaam tv

धर्मांतराबाबत (Conversions) उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद हायकोर्टाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सामूहिक धर्मांतराला परवानगी दिल्यास भारतातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होण्याचा धोका आहे, असे मत अलाहाबाद हायकोर्टाने (allahabad high court) व्यक्त केले. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी सोमवारी एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. असे धार्मिक कार्यक्रम ताबडतोब बंद केले पाहिजे असे देखील कोर्टाने यावेळी सांगितले.

High Court: धर्मांतर थांबले नाही तर भारतातील बहुसंख्य जनता अल्पसंख्याक होईल, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता
Bombay High Court Job: मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती, तब्बल ५७ हजार मिळणार पगार, शिक्षणाची अट काय?

अलहाबाद हायकोर्टाने धर्मांतर प्रकरणातील एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना ही महत्वपूर्ण टिप्पणी केली. मानसिकरित्या आजारी असलेल्या उत्तर प्रदेशमधील एका गावकऱ्याला ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केल्याचा या व्यक्तीवर आरोप आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना हायकोर्टाने सांगितले की, उत्तर प्रदेशात अनुसूचित जाती/जमाती, इतर जाती आणि आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांचे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्मात बेकायदेशीरपणे धर्मांतर केले जात आहे. हे त्वरित थांबवावे. उत्तर प्रदेश राज्यामध्ये हे धर्मांतर मोठ्याप्रमाणात होत आहे.

High Court: धर्मांतर थांबले नाही तर भारतातील बहुसंख्य जनता अल्पसंख्याक होईल, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता
High Court On Mumbai Local: लोकलच्या गर्दीवरुन हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं!

यासोबतच आमिष दाखवून धर्म बदलण्याचा खेळ असाच सुरू राहिला तर देशातील बहुसंख्य जनता एक दिवस अल्पसंख्याक होईल, असेही मत हायकोर्टाने यावेळी व्यक्त केले. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी सांगितले की, संविधानाचे कलम २५ जे नागरिकांना कोणत्याही धर्माची निवड करण्याचा आणि त्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार देते. पण धार्मिक धर्मांतराची तरतूद करत नाही. हे फक्त अंत:करण, धर्माच्या आचारण आणि प्रचाराला स्वतंत्रता प्रदान करते. पण अशा घटना संविधानाचे कलम २५ द्वारे दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या विरोधात आहे. धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य कोणालाही धर्मांतर करण्यास परवानगी देत ​​नाही.

High Court: धर्मांतर थांबले नाही तर भारतातील बहुसंख्य जनता अल्पसंख्याक होईल, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता
Mumbai High Court : मुंबईतील चेंबूरच्या कॉलेजमधील हिजाब बंदी कायम; मुंबई हायकोर्टाने फेटाळली विद्यार्थिनींची याचिका, VIDEO

दरम्यान, एका हिंदू व्यक्तीचे ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर केल्याचा आरोप हमीरपूर येथील कैलासवर आहे. कैलासचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला. रामकली प्रजापती यांनी आपला भाऊ मानसिकरित्या आजारी असल्याची तक्रार दाखल केली होती. रामकली यांच्या भावाला कैसाल एका आठवड्यासाठी दिल्लीला घेऊन गेला. उपचार करून त्यांचा भाऊ गावी परत येईल असे कैलासने त्यांना सांगितले होते. पण तो परत आला नाही. कैलास गावातील इतर लोकांना घेऊन दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात गेला होता. जिथे त्यांचे धर्मांतर झाले. त्या बदल्यात तक्रारदाराच्या भावाला पैसे दिले जातात.

High Court: धर्मांतर थांबले नाही तर भारतातील बहुसंख्य जनता अल्पसंख्याक होईल, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता
High Court Bharti 2024: दहावी पास तरुणांना हायकोर्टात नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ९२००० रुपये मिळणार पगार, अर्ज कसा कराल?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com