समरजितसिंह यांना कागलमधून मुश्रीफांच्या विरोधात उतरवण्याची शरद पवारांची खेळी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे कोल्हापुरच्या राजकीय आखाड्यात नेमकं काय घडतंय पाहूया. आगामी विधानसभेसाठी शरद पवारांनी शठ्ठू ठोकलेत. त्यासाठी पवार सध्या राज्यातील कानाकोपरा पिंजून काढतायत. त्यातच राष्ट्रवादीची मूळ ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात आता पवारांनी मोहरे हलवण्यास सुरुवात केल्याचं कळतंय.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोल्हापूरमधील भाजपचे नेते समरजीत घाटगेंना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरुएत. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास हा फडणवीसांसाठी मोठा धक्का असेल..
घाटगे तुतारी फुंकणार?
समरजीत घाटगे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय
2019 विधानसभेत फडणवीसांकडून घाटगेंना उमेदवारी जाहीर
युतीत जागा शिवसेनेकडे, घाटगे अपक्ष लढले
यंदाही कागलमधून हसन मुश्रीफांना उमेदवारी?
समरजीत घाटगेंवर पुन्हा अपक्ष लढण्याची वेळ येण्याची शक्यता
यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घाटगेंना गळाला लावण्याचे प्रयत्न
याबाबत कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफांना विचारला असता त्यांनीही आमदारकीबाबत सूचक वक्तव्य केलंय. दरम्यान समरजित घाटगेंनी साम टीव्हीशी बोलताना सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
'मी महायुतीत,आमदारही होणार'
मी महायुतीतच,माझ्याबद्दल काहींकडून खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न सुरू. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कागलमधून मीच आमदार होणार. माझी तयारी पूर्ण झाली. त्यामुळे काहींच्या पोटात गोळा आला आहे. वेळप्रसंगी अपक्ष लढू मात्र इतर ठिकाणी जाणार नाही.
- समरजितसिंह घाटगे
पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्लाय. मात्र याच बालेकिल्ल्यात महायुतीत आलेल्या अजित पवारांचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपात पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला झुकतं माप मिळाल्यास, नाराज,बंडखोरांना गळाला लावण्याचा प्रयत्न निश्चितच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून होणार.त्यामुळेच महायुतीलाच आणि विशेषतः भाजपची डोकेदुखी वाढणार यात शंका नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.