Karad North Assembly Election: शरद पवारांचा शिलेदार षटकार मारणार? बाळासाहेब पाटलांसमोर महायुतीचे तगडे आव्हान; कसं असेल राजकीय समीकरण?

karad Uttar Vidhansabha Election 2024: कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून सहाव्यांदा आमदारकी मिळवण्यासाठी बाळासाहेब पाटील हे मैदानात उतरणार आहेत. मात्र यावेळी त्यांच्यासाठी ही लढाई सोपी नसेल असे चित्र दिसत आहे.
Karad North Assembly Election: शरद पवारांचा शिलेदार षटकार मारणार? बाळासाहेब पाटलांसमोर महायुतीचे तगडे आव्हान; कसं असेल राजकीय समीकरण?
karad Uttar Vidhansabha Election 2024Saamtv
Published On

राज्यात विधानसभा निवडणुकाचे वारे वाहू लागले असून महायुती तसेच महाविकास आघाडीमधील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभेतही दादांना धक्का देण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा गड मजबूत करण्यासाठी शरद पवारांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

शरद पवार यांच्यासमोर अजित पवार यांच्या बंडानंतरही सोबत राहिलेल्या निष्ठावंताना ताकद देत पुन्हा विधानसभेवर पाठवण्याचे मोठे आव्हान असेल. शरद पवारांसोबत कायम राहिलेले नाव म्हणजे कराड उत्तर विधानसभेचे आमदार बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील यांच्यासमोर या निवडणुकीतही भाजपचे आव्हान असेल. दुसरीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्याने अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटाची ताकदही त्यांना थोपवावी लागणार आहे. कसं असेल कराड विधानसभेचे चित्र? वाचा सविस्तर

Karad North Assembly Election: शरद पवारांचा शिलेदार षटकार मारणार? बाळासाहेब पाटलांसमोर महायुतीचे तगडे आव्हान; कसं असेल राजकीय समीकरण?
Maharashtra Politics: ब्रेकिंग! मावळात विधानसभेसाठी महायुतीत रस्सीखेच; अजित पवार गटाच्या उमेदवाराला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

कराड उत्तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला!

कराड उत्तर हा माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळख असलेले यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील हे सध्या कराड उत्तरचे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या बंडानंतर अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जात असताना बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

बाळासाहेब पाटील षटकार मारणार?

बाळासाहेब पाटील हे १९९९ पासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशी सलग पाचवेळा आमदारकीचे मैदान मारण्याची किमया त्यांनी केली आहे. यापैकी एकदा अपक्ष तर चार वेळा ते राष्ट्रवादीमधून निवडून आलेत. या आकड्यांवरुन बाळासाहेब पाटील यांची मतदारसंघावरील दबदबा स्पष्ट होतोय. आता सहाव्यांदा आमदारकी मिळवण्यासाठी बाळासाहेब पाटील हे मैदानात उतरणार आहेत. मात्र यावेळी त्यांच्यासाठी ही लढाई सोपी नसेल असे चित्र दिसत आहे.

Karad North Assembly Election: शरद पवारांचा शिलेदार षटकार मारणार? बाळासाहेब पाटलांसमोर महायुतीचे तगडे आव्हान; कसं असेल राजकीय समीकरण?
Sharad Pawar News : अजित पवार यांना झटका, आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र शरद पवारांच्या मेळाळ्यात

पुन्हा तिरंगी लढत होणार का?

या मतदार संघामध्ये बाळासाहेब पाटील यांना आव्हान देणारे धैर्यशील कदम हे काँग्रेस, शिवसेना पक्षात होते आणि सध्या भाजपात सामील झाले आहेत. त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे मनोज घोरपडे हे मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार होते, ते सुद्धा सध्या भाजपमध्येच आहेत. त्यामुळे या विधानसभेला या दोघांपैकी एकाचे आव्हान असण्याची शक्यता आहे. अर्थातच तिकीट वाटपावरुन वाद रंगून बंडाचा झेंडा फडकणार का? कराड उत्तरमध्ये तिरंगी लढत होणार का? याबाबतचे चित्र अंतिम टप्प्यातच स्पष्ट होईल.

२०१९ ला काय झालं?

२०१९ मध्ये कराड उत्तर विधानसभेत तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी धैर्यशिल कदम यांनी शिवसेनेकडून तर मनोज घोरपडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी 1 लाख 509 मते, अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना 51 हजार 294 मते तर 31 हजारत 791 मते घेत धैर्यशील कदम तिसऱ्या स्थानी राहिले होते. आता या निवडणुकीत दोघांपैकी एकाचे आव्हान बाळासाहेब पाटील यांच्यासमोर असेल.

Karad North Assembly Election: शरद पवारांचा शिलेदार षटकार मारणार? बाळासाहेब पाटलांसमोर महायुतीचे तगडे आव्हान; कसं असेल राजकीय समीकरण?
Sambhajinagar Crime : संभाजीनगरमधून तीन महिन्यापूर्वी एटीएम केले लंपास; सेलू तालुक्यात एका विहिरीत सापडले मशीन

कोणाचे पारडे जड?

सलग पाच वर्ष आमदार असल्याने कराड उत्तर मतदार संघावर बाळासाहेब पाटील यांची पकड मजबूत आहे. शरद पवार यांचे निष्ठावंत अशी बाळासाहेब पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे विविध विकासकामे, दांडगा जनसंपर्क, शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या बाळासाहेब पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत.

दुसरीकडे महायुतीकडून उमेदवार मानले जाणारे भाजपचे धैर्यशील कदम यांनाही शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद मिळणार आहे. अलिकडच्या काळात धैर्यशील कदम यांनी मतदार संघात केलेल्या विकासकामांचाही त्यांना फायदा होणार आहे. तर मागच्यावेळी अपक्ष राहिलेले मनोज घोरपडे यांनीही आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे यंदा बाळासाहेब पाटील षटकार मारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Karad North Assembly Election: शरद पवारांचा शिलेदार षटकार मारणार? बाळासाहेब पाटलांसमोर महायुतीचे तगडे आव्हान; कसं असेल राजकीय समीकरण?
Satara Assembly Election: सातारा विधानसभेत पुन्हा भाजपचा झेंडा? शिवेंद्रराजेंना रोखण्याचे शरद पवारांसमोर आव्हान; मविआ कोणता डाव टाकणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com