Sambhajinagar Crime : संभाजीनगरमधून तीन महिन्यापूर्वी एटीएम केले लंपास; सेलू तालुक्यात एका विहिरीत सापडले मशीन

Sambhajinagar News : संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन होते. अज्ञात चोरट्यांनी ते एटीएम मशीन उचलून वाहनात टाकून चोरी केले
Sambhajinagar Crime
Sambhajinagar CrimeSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमध्ये तीन महिन्यांपूर्वी म्हणजे २२ एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी एक एटीएम मशीन लंपास केले होते. हे मशीन परभणी जिल्ह्यातील एका विहिरीमध्ये सापडून आले आहे. त्या एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर चोरट्यांनी हे एटीएम मशीन सेलू तालुक्यातील झोडगाव शिवारातील एका विहिरीत फेकून दिले होते. या मधून चोरट्यांनी ७ लाख ४६ हजार रुपयाची रोकड लंपास केली होती. पण संभाजीनगरच्या पोलिसांनी तीन महिन्यात या आरोपींचा छडा लावला आणि संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला. पोलिसांनी हे एटीएम मशीन विहिरीतून बाहेर काढून हस्तगत केले आहे.

Sambhajinagar Crime
Nashik Crime : सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

संभाजीनगरच्या (sambhajinagar) वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव परिसरातील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन होते. अज्ञात चोरट्यांनी ते एटीएम मशीन उचलून वाहनात टाकून चोरी केले होते. आरोपींनी सिडको परिसरातूनच एक टेम्पो चोरी केला होता आणि या टेम्पो मधूनच हे एटीएम मशीन चोरट्याने पसार केले होते. (ATM) एटीएम चोरीचा गुन्हा घडल्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि काही दिवसातच वैजापूर शिरूर पोलिसांनी विष्णू रामभाऊ आकात (रा. सातोना, ता. परतुर) व देवा सुभाष तावडे (रा. पुंडलिक नगर) या दोन आरोपींना पकडले होते. या दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. 

Sambhajinagar Crime
Nandurbar News : मृत्यूनंतरही मरण यातना संपेनात; अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीव धोक्यात घालून प्रवास Video

पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलेल्या दोघांनी सांगितले की त्यांचे साथीदार लक्ष्मण जाधव (रा. वांगी, जि. नांदेड), लकी सुभाष तावडे (रा. पुंडलिक नगर) व महेश लक्ष्मण आकात (रा. सातोरा) यांच्या मदतीने २२ एप्रिलला मध्यरात्री टेम्पोला दोरी व साखळी बांधून एटीएम मशीन नेले होते. एटीएम मशीन कापून त्यातील सात लाख ४६ हजार १०० रुपयाची रोकड लंपास केली होती. गुन्हा कबूल केल्यानंतर आरोपींनी कापलेले एटीएम मशीन परभणीच्या सेलू तालुक्यातील झोडगाव शिवारातील एका विहिरीत टाकल्याचे कबूल केले. त्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी थेट सेलू तालुक्यातील झोडगाव शिवारात जात विहिरीतून एटीएम मशीन बाहेर काढत ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक आयुक्त महेंद्र देशमुख, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वी कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com