Nashik Crime : सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nashik News : दुकानाजवळच गाडी लावली आणि दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळे रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्याने शटरच्या कड्या आणि लोखंडी जाळीच्या काड्या काढण्यात आले
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 
नाशिक
: नाशिकच्या जुने नाशिक परिसरात आझाद चौकात असलेल्या सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. सराफाचे दुकान फोडण्याच्या इराद्याने आलेल्या चोरट्यानी शटर तोडत असताना त्याचा आवाज आला. यामुळे परिसरातील जागरूक नागरिकांनि आरडाओरड केल्याने हा प्रयत्न फसला आहे.  

Nashik Crime News
Dudhana Project : पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही लोअर दुधना प्रकल्प तहानलेलाच; प्रकल्पात केवळ ९.७५ टक्के जलसाठा

जुने नाशिक (Nashik) परिसरात असलेल्या सराफ दुकानात दरोडा टाकण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन चोरटे आले होते. त्यांनी दुकानाजवळच गाडी लावली आणि दुकानात असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यावर काळे रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्याने शटरच्या कड्या आणि लोखंडी जाळीच्या काड्या काढण्यात आले. मात्र समोरच्या दुकाना बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हा संपूर्ण चोरीचा प्रकार कैद झाला आहे. एस.  के. ज्वेलर्स समोर राहणारा मुदस्सर शेख याला शटर तोडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी पळ (Nashik crime News) काढला. ही सगळी घटना रात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे.  

Nashik Crime News
Beed News : नगर पालिकेच्या कोंडवाड्यात गायीचा मृत्यू; शवविच्छेदनानंतर धक्कादायक माहिती आली समोर

विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून हाकेच्या अंतरावर दोन पोलीस चौकी आहेत. मात्र पोलिसांना याबाबत कुठली खबर नव्हती. एकूणच आझाद चौक भागात दिवसभर वर्दळ असते. तर रात्री उशिरापर्यंत लोक घराबाहेर बसलेले असतात. मात्र अशा ठिकाणी चोरीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com