Beed News : नगर पालिकेच्या कोंडवाड्यात गायीचा मृत्यू; शवविच्छेदनानंतर धक्कादायक माहिती आली समोर

Beed News : मोकाट जनावरे रस्त्यावरच फिरत असतात. शिवाय रस्त्यावरच बसलेले असतात. दरम्यान बीड शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी २५ जुलै २०२४ पासून मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी विशेष पथक नियुक्त केले
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे सर्रासपणे फिरत असतात. परंतु बीडमध्ये मोकाट जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नगर पालिकेने मोकाट जनावरांना पकडून नगरपालिकेच्या कोंडवाड्यात ठेवले असतांना कोडवाड्यात पाच महिन्यांची गर्भवती असलेली गाय मृत झाली आहे. या गायीचे शवविच्छेदन केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Beed News
Jawahar News : आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; आठवडाभरात मृत्यूची दुसरी घटना

मोकाट जनावरे रस्त्यावरच फिरत असतात. शिवाय रस्त्यावरच बसलेले असतात. दरम्यान बीड (Beed) शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी २५ जुलै २०२४ पासून मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकाने जवळपास ५० मोकाट जनावरांना पकडून शहरातील खासबाग व नेहरूनगर भागातील कोंडवाड्यात ठेवले आहे. या कोंडवाड्यात असलेल्या एका (Cow) गायीचा मृत्यू झाला असून तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले. 

Beed News
Dudhana Project : पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही लोअर दुधना प्रकल्प तहानलेलाच; प्रकल्पात केवळ ९.७५ टक्के जलसाठा

गायीच्या पोटात वासरू अन् ४० किलो प्लास्टिक

मृत गायीचे शवविच्छेदन केले असता तिच्या पोटात वासरू अन् तब्बल ४० किलो प्लास्टिक निघाले आहे. तर या गायीचा मृत्यू प्लास्टिकमुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज आता पशुधन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर याविषयी डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर सर्व सॅम्पल छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण अधिकृतरीत्या समोर येणार आहे; असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com