Jawahar News : आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; आठवडाभरात मृत्यूची दुसरी घटना

Jawahar News : जव्हार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव संचालित अनुदानित आश्रम शाळा खुडेद या आश्रम शाळेत विद्यार्थी मृत्यूची घटना घडली
Jawahar News
Jawahar NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
जव्हार
: जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून मागील आठवडाभरात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना आहे. 

Jawahar News
Selu Bajar Samiti : तीन लाख क्विंटल कापूस खरेदीनंतर मार्केटचा काटा बंद

एकीकडे जागतिक आदिवासी दिनाची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. जव्हार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव संचालित अनुदानित आश्रम शाळा (Ashram School) खुडेद या आश्रम शाळेत विद्यार्थी मृत्यूची घटना घडली आहे. या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणारा संजय रावते (वय 9) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. संजय रावते हा विद्यार्थ्यी गेल्या तीन दिवसांपासून आजारी होता. मात्र याकडे आश्रम शाळेतील अधिक्षक व मुख्याध्यापक यांनी दुर्लक्ष केले विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली. 

Jawahar News
Dhule Accident : पुलावरून कार थेट नाल्यात कोसळली; एकाचा मृत्यू, चार जण जखमी

दरम्यान उपचार लवकर न मिळाल्याने सदर विद्यार्थ्याला जास्त प्रमाणात उलट्या व जुलाब होऊ लागल्यानंतर आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याने या विद्यार्थ्याला विक्रमगड येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला. यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे एका आठवड्यात आश्रम शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची दुसरी घटना आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com