Dudhana Project : पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही लोअर दुधना प्रकल्प तहानलेलाच; प्रकल्पात केवळ ९.७५ टक्के जलसाठा

Parbhani News : जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर निम्न दुधनेत वेगाने पाणीसाठा होतो. गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ २७ दलघमी इतकेच पाणी आले होते
Dudhana Project
Dudhana ProjectSaam tv
Published On

परभणी : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे बहुतांश धरणाची पाणी पातळी वाढली आहे. मात्र परभणी व जालना जिल्ह्यातील शहरासह शेकडो गावाची तहान भागविणाऱ्या निम्न दुधना प्रकल्प पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही भरलेला नाही. चांगला दमदार पाऊस न झाल्याने प्रकल्पात केवळ ९.७५ टक्के इतका पाणी साठा आहे. 

Dudhana Project
Selu Bajar Samiti : तीन लाख क्विंटल कापूस खरेदीनंतर मार्केटचा काटा बंद

जालना (Jalna) जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर निम्न दुधनेत वेगाने पाणीसाठा होतो. गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पावसाळ्यातील (Rain) चार महिन्यात केवळ २७ दलघमी इतकेच पाणी आले होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत जून महिन्यापासून ४४ दलघमी एवढे पाणी आले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पात ९.७५ जिवंत जलसाठा आहे. दरम्यान, जून महिन्यात २०.७०, जुलैमध्ये २०.९० व ऑगस्ट महिन्यात ३ दलघमी अशी एकूण ४४ दलघमी एवढी पाण्याची आवक झाली असून धरण क्षेत्रात ५१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Dudhana Project
Jawahar News : आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; आठवडाभरात मृत्यूची दुसरी घटना

दमदार पावसाची प्रतीक्षा 

अद्याप दुधना प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने प्रकल्प अद्यापही तहानलेला आहे. जून महिन्यापासूनच प्रकल्पात ४४ दलघमी एवढी पाण्याची आवक झाली आहे. समाधानकारक पाणी साठा न झाल्याने जालना व (Parbhani) परभणी जिल्ह्यातील अनेक गावांवर पाण्याच्या समस्या ओढवू शकते. यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा असून चांगला पाऊस पडल्यास प्रकल्पात पाणी साठा वाढू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com