Assembly Election: महायुती आणि मविआचं टेंशन वाढलं? जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरणार, कोणाला बसणार फटका?

Manoj Jarange Patil News: 20 जुलैला उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगेंना विधानसभेचे वेध लागलेत. त्यातच जरांगेंनी इच्छुक कार्यकर्त्यांना कागदपत्रं जमा करण्यास सांगत विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. मात्र जरांगे मैदानात उतरले तर त्याचा फटका कुणाला बसणार?
महायुती आणि मविआचं टेंशन वाढलं? जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरणार, कोणाला बसणार फटका?
Assembly Election 2024Saam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत कुणाला पाडायचं? की तिसऱ्या आघाडीत जाऊन निवडणूक लढायची याचा फैसला मनोज जरांगे 29 ऑगस्टला करणार आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं टेंशन वाढलंय. त्यातच सगेसोयऱ्यांबाबत सरकारकडून जीआर काढण्यासंदर्भातील हालचाली दिसत नसल्यानं मनोज जरांगेंनी कार्यकर्त्यांना निवडणूकीच्या तयारीचे संकेत दिलेत.

लोकसभा निवडणूकीत जरांगे फॅक्टरचा महायुतीला जोरदार फटका बसला. तर मराठवाड्यातून भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेलाही सत्ताधारी आणि विरोधकांनी जरांगे फॅक्टरचा धसका घेतलाय. कारण जरांगेंनीच मतांचं गणित मांडलंय. त्यापार्श्वभूमीवर जरांगे फॅक्टरचा फटका नेमका कुणाला बसणार, हे जाणून घेऊ...

महायुती आणि मविआचं टेंशन वाढलं? जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरणार, कोणाला बसणार फटका?
Devendra Fadnavis : फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी बाजारबुणगे, कथित विचारवंतांची टोळी; देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणाकडे?

जरांगे लढणार, कुणाला नडणार?

आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघात 1 लाख 80 हजार मराठा मतं आहेत. जामनेर मतदारसंघात 1 लाख 36 हजार मराठा मतं आहेत. येवला मतदारसंघात 1 लाख 36 हजार मराठा मतं आहेत. परळी मतदारसंघात 1 लाख 14 हजार मराठा मतं असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं होतं.

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि खान्देशातील 50 जागांवर जरांगेंनी तयारी केलीय. तर 7 ऑगस्टपासून दौरा केल्यानंतर पुढील जागांवरची भूमिका ठरवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जरांगे आरक्षणाच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप होऊ नये म्हणून मनोज जरांगेंनी सावधतेनं पावलं टाकायला सुरुवात केलीय. तर आऱक्षणाच्या निर्णयाचा चेंडू महायुती आणि महाविकास आघाडीच्या कोर्टात टाकत जरांगेंनी जोरदार फिल्डिंग लावलीय.

महायुती आणि मविआचं टेंशन वाढलं? जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरणार, कोणाला बसणार फटका?
Chandgad Vidhan Sabha : महायुतीत बंडखोरीचं वारं, मविआचा सावध पवित्रा? गटातटाच्या राजकारणात कोण राखणार चंदगडची 'पाटीलकी'?

बच्चू कडूंसह राजू शेट्टींनीही जरांगेंना शेतकरी आघाडीत येण्याचं आवाहन केलंय. मात्र 2019 च्या निवडणूकीत MIM आणि वंचितच्या युतीमुळे भाजपला तर 2024 च्या लोकसभा निवडणूकीत जरांगे फॅक्टरचा महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता जरांगे विधानसभेच्या रिंगणात उडी घेत महायुतीला नडणार की महाविकास आघाडीचं गणित बिघडवणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com