Chandgad Vidhan Sabha : महायुतीत बंडखोरीचं वारं, मविआचा सावध पवित्रा? गटातटाच्या राजकारणात कोण राखणार चंदगडची 'पाटीलकी'?

Vidhan Sabha Election : चंदगड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेश पाटील यांंना भाजपचे शिवाजीराव पाटील, डॉ. नंदिनी बाभूळकर, अप्पी पाटील यांचं आव्हान असणार आहे.
Chandgad Vidhan Sabha
Chandgad Vidhan SabhaSaam Digital
Published On

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकांची समीकरणं बदलली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचा मतदारसंघ असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातही मोठ्या घडामोडी घडतायेत. चंदगडमध्ये गटातटाचं राजकारण मोठं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमुळे गटातटाच्या या राजकारणाला आणखी बळ मिळालं आहे. महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर महाविकास आघाडीने अद्यापतरी सावध पवित्रा घेतला आहे.

Chandgad Vidhan Sabha
Maharashtra Politics : 'म्हणून आज भुजबळांची वाणी संतांसारखी...बाण कमी, अध्यात्म जास्त'; देवेंद्र फडणवीसांकडून पंढरपुरात तुफान फटकेबाजी

चंदगडच्या राजकारणात 'दौलत' नेहमीचं केंद्रस्थानी राहिलेला आहे. तालुक्याच्या विकासात महत्त्वाचं स्थान असलेल्या या साखर कारखान्याचं राजकारण मागच्या एक दोन निवडणुकामंध्ये थोडं मागे पडलं होतं. मात्र दौलत-अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांची चंदगडच्या राजकारणात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार राजेश पाटील यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत निसटता विजय मिळाला होता. राजेश पाटील सध्या अजित पवार गटासोबत आहेत, मात्र त्यांना भाजपचे शिवाजीराव पाटील आणि विनायक उर्फ अप्पी पाटील याचं मोठं आव्हान असणार आहेच, मात्र डॉ. नंदिनी बाभुळकर आणि दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर निवडणुकीचं चित्र काहीसं वेगळं असण्याची शक्यता आहे.

संपूर्ण चंदगड तालुका,आजरा आणि गडहिंग्लज तालुक्याचा काही भाग मिळून बनलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राजेश पाटील यांचा अवघ्या ४३८५ मतांनी विजय झाला होता. त्यांना ५५५५८ मंत मिळाली होती, तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि भाजपमध्ये बंडखोरी केलेले शिवाजीराव पाटील यांना ५१,१७३ मतं मिळाली होती. अप्पी पाटील ४३, ९७३ मते घेऊन तिसऱ्या स्थानी होते. शिवसेनेच्या संग्रामसिंह कुपेकर यांना ३३ हजार २१४ मतं मिळाली होती. चारही उमेदवारांना मोठी मतं मिळाली होती. यावेळी महायुती आणि महाविकास अशी लढत आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे.त्यामुळे जर नंदिनी बाभूळकर निवडणुकीच्या रिंगण्यात उतरल्या तर चुरशीची लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Chandgad Vidhan Sabha
US Presidential Election : कशी होते अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक? भारत आणि अमेरिकेच्या लोकशाहीत काय आहे फरक? वाचा सविस्तर

चंदगड मतदारसंघात मुळात गटातटाचं राजकारण मोठं आहे. मागच्या निवडणुकीतही ते पहायला मिळालं. भाजपकडून उमदेवारी न मिळाल्यामुळे शिवाजीराव पाटील यांनी बंडोखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजपने सहकार क्षेत्रात मोठं काम नाव असलेले अशोक चराठी यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूक लढवली. त्यांना १२, ७०० मतं मिळाली होती. शिवाजीराव पाटील यांच्यामुळे भाजपचं विजयाचं गणित बिघडलं होतं. दरम्यान सध्या काजू उत्पादक शेतकरी आणि तालुक्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवरून आमदार राजेश पाटील यांच्याविषयी तालुक्यात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे येणाऱ्या विधासभा निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Chandgad Vidhan Sabha
Chandigarh Court Firing : सस्पेंड पोलीस महानिरीक्षकाचा पारा चढला, अधिकारी जावयाला भरकोर्टात गोळ्या घातल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com