चंदिगडच्या जिल्हा न्यायालयात धक्कादायक घटना घडली आहे. एका निलंबित अतिरिक्त पोलीस महासंचालक ( एआयजी) सासऱ्याने आपल्या जावयावर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. जावई आयआरएस अधिकारी होता. या घटनेनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सासऱ्याला ताब्यात घेतलं आहे. सासऱ्याने जावयावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोन गोळ्या त्याला लागल्या आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरप्रीत सिंग कृषी विभागात आयआरएस पदावर कार्यरत होते. दरम्यान पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला सुरू असल्यामुळे ते आज चंदिगडच्या जिल्हा न्यायालयात आज हरप्रीत सिंग पोहोचले होते. सुनावणीदरम्यान त्यांचे सासरे निलंबित एआयजी मानवाधिकार मलविंदर सिंग सिद्धूही न्यायालयात पोहोचले होते. न्यायालयात सुनावणी सुरू असताना दोन्ही पंक्षकारांशी चर्चा सुरू होती. यादरम्यान मानवाधिकार यांनी वॉशरूममध्ये जावून येतो असं सांगितलं.
वॉशरूमचा दाखवण्यासाठी जावई हरप्रीतने मानवाधिकारला घेऊन गेले. त्यानंतर दोघेही वॉशरूममध्ये गेले आणि आरोपी सासरा मालविंदरने बंदुक काढून एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या हरप्रीतला लागल्या. गोळीबाराच्या आवाजानंतर संपूर्ण न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. कोर्टात उपस्थित सर्व वकील आणि कर्मचाऱ्यांनी वॉशरूमकडे धाव घेतली आणि मानवाधिकारला एका खोलीत बंद केले.
वकिलांनी जखमी हरप्रीतला तातडीने ॲम्ब्युलन्स बोलवून सेक्टर 16 रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हरप्रीतला मृत घोषित केले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी सासऱ्याला ताब्यात घेऊन पुरावे गोळा केले. घटनेनंतर न्यायालयाच्या आवारात उपस्थित न्यायाधीशही घटनास्थळी पोहोचले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.