IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर गेली कुठे! पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती आली समोर

IAS Pooja Khedkar Case/ UPSC Exam : माजी वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी भारतातून पलायन केल्याच्या चर्चा होत्या, मात्र पोलिसांच्या तपासात त्या भारतातच असल्याची माहिती आहे.
Pooja Khedkar
Pooja KhedkarSaam Tv
Published On

माजी वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर यांना UPSC ने दोषी ठरवलं आहे. तात्पुरती केलेली नियुक्तीही रद्द केली आहे. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असल्यामुळे त्यांनी भारतातून पलायन केल्याच्या चर्चा होत्या, दुबईला गेल्याची मागच्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र पोलिसांच्या तपासात त्या भारतातच असल्याची माहिती आहे.

Pooja Khedkar
IMD Rain Alert : राज्यात पुढचे २ दिवस अतिमुसळधार पाऊस; हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सरकार, AIMS आणि मसुरी सेंटरकडून पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील संपूर्ण माहिती मागवली आहे. पूजाने सादर केलेल्या कागदपत्रंही मागीतली आहेत. या प्रकरणाशी संबंधीत सर् कागदपत्र पोलिसांकडे आल्यानंतर पोलीस पूजाला चौकशीसाठी बोलवणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने गुरुवार पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे अटकेच्या भीतीने पूजा खेडकर पसार झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. पूजा खेडकर परदेशात पळून गेल्याची सूत्रांनी माहिती होती. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. खेडकर यांनी मागासवर्ग प्रवर्गातून १२ वेळा UPSC परीक्षा दिल्याचं समोर झालं आहे.

Pooja Khedkar
Uddhav Thackeray Speech: 'अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा', उद्धव ठाकरेंचा घणाघात, फडणवीसांवरही तोफ डागली; पुण्यातील सभेत जोरदार बरसले!

इतर मागासवर्गीय प्रवर्गातून UPSC ची ९ वेळा परीक्षा देण्याची मुभा असते. मात्र पूजा खेडकर यांनी आपल्या नावात तब्बल सहा वेळा बदल करून १२ वेळा परीक्षा दिल्याचं समोर आलं. UPSC चा फॉर्म भरतानाही स्वतःच्या नावाचं स्पेलिंग अनेकदा बदलल आहे. कधी वडिलांच्या नावात तर कधी आईच्या नावात बदल करुन फॉर्म भरला आहे. दिल्ली पोलिसांच्या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर पटियाला कोर्टानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे, त्यामुळे त्यांनी परदेशात पलायन केल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्या भारतातच असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Pooja Khedkar
Success Story: २ बाय ४ ची खोली अन् पार्ट टाइम जॉब ;कोणताही क्लास न लावता कोल्हापूरची मनाली शिंदे झाली PSI; गोष्ट ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com