Devendra Fadnavis : फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी बाजारबुणगे, कथित विचारवंतांची टोळी; देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणाकडे?

Maharashtra Politics : फेक नरेटिव्ह पसरवण्यासाठी बाजार बुणगे आणि कथित विचारवंतांची टोळी तयार करण्यात आल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आता फेक नरेटिव्ह ला फेक नरेटिव्हनेचं उत्तद दिलं जाईल, अस्ंही त्यांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Digital
Published On

महाराष्ट्रात यंदा आपली लढाई चौथ्या पक्षाशी म्हणजे फेक नरेटिव्ह सोबत होती. दुर्दैवाने आपण इफेक्टिव्ह उत्तर दिलं नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांत औकात नव्हती. लोकांचा विश्वास त्यांच्यावर नाही. त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवण्यासाठी बाजार बुणगे आणि कथित विचारवंतांची टोळी तयार करण्यात आल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दलित समाज, मुस्लिम समाज आणि शेतकऱ्यामध्ये फेक नारेटिव्ह पसरवला. त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश गेला. फेक निरीटिव्हला फेक नरेटिव्हने उत्तर देण्याचं ठरवलं आहे. अनिल देशमुख यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्या म्हणत पोस्टर काढला आणि त्याखाली लिहिलं ही योजना फक्त तीन महिन्यासाठी आहे. त्यांना महिला आघाडीने उत्तर दिलं पाहिजे. तुमच्या सारखे आम्ही चोर नाही. जो शब्द लाडक्या बहिणींना दिला तो शब्द मोडला जाणार नाही.शेतकरी महिला असो, मोफत वीज मोफत देत आहे. कापड उत्पादक याना अनुदान देणार आहे.

लाडक्या बहिणीसाठी पैसे कुठून आणणार अस प्रश्न शरद पवार विचारतात, मात्र त्यांनी पहिलं राहुल गांधींना विचारावं, की खटाखट ८५०० रुपये तुम्ही देऊ शकतात तर आम्ही 1500 का नाही. त्यांच्याकडे काय झाडाला पैसे लागले की लॉटरी लागली की अमेरिकेच्या बँकवर डल्ला मारला.आपण शंभर किलोमीटरचा रस्ता बांधला असला तरी त्यावर बोलत नाही. मात्र त्यांच्याकडे एक किलोमीटरचा रस्ता बांधला तर त्यावर ते मार्केटिंग करून बोलतात.

Devendra Fadnavis
Chandgad Vidhan Sabha : महायुतीत बंडखोरीचं वारं, मविआचा सावध पवित्रा? गटातटाच्या राजकारणात कोण राखणार चंदगडची 'पाटीलकी'?

सावनेर विधानसभेवर महाविकास आघाडीचा भगवा फडकेल. जिल्हा बँक घोटाळा 22 वर्षांपूर्वी झाला. कोर्टाने त्यांना शिक्षा केली. पण ते सांगतात भाजप आणि माझ्या विरोधात कट केला सांगतात. नागपूर जिल्ह्याची बँक संपली. नागपूर जिल्ह्याची बँक जिवंत असती. तुमच्या आशीर्वादाने माझ्यासारखा मुख्यमंत्री असता. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सहकारी बँक पुढे आपली नागपूरची बँक नेली असती, असं म्हणत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर निशाण साधला.

अनिल देशमुख यांना आरोप करत सहानुभूती मिळवायची आहे. या लोकांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्या आरोपांवर मी बोलणं हा माझा कमीपणा समजतो, पण नागपूर जिल्ह्याच्या लोकांना माहिती पाहिजे म्हणून मी बोलतो. यांचा खरा चेहरा दिसला पाहिजे.

सकाळचा भोंगा सुरू होतो. राष्ट्रवादीचे तीन लोक बोलतात त्या ताई बोलतात. काँग्रेसचे तीन लोक बोलतात. सकाळपासून नऊ ते दहा लोक फक्त माझ्यावर बोलतात. देवेंद्र फडणवीस जात नाहीत तोपर्यंत निवडून येता येत नाही. हे त्यांना माहिती आहे. माझी शक्ती काय आहे हे अधोरेखित करण्याचं काम ते करतात. पण देवेंद्र फडणवीस यांची ताकद हजारो कार्यकर्ते असल्याचं ते म्हणाले.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics : 'म्हणून आज भुजबळांची वाणी संतांसारखी...बाण कमी, अध्यात्म जास्त'; देवेंद्र फडणवीसांकडून पंढरपुरात तुफान फटकेबाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com