Vidhan Sabha Election : उद्धव ठाकरेंची शिवसेना विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकणार? सर्वेक्षणातून आकडेवारी समोर

Uddhav Thackery's Shivsena Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीने एक सर्व्हे केला. या सर्व्हेतून मतदारांचा कल जाणून घेण्यात आलाय.
Uddhav Thackery's Shivsena Vidhan Sabha Election 2024
Uddhav Thackery's Shivsena Vidhan Sabha Election 2024Saam TV
Published On

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते सध्या जागावाटपावरून चर्चा करीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे. अशातच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीने एक सर्व्हे केला.

Uddhav Thackery's Shivsena Vidhan Sabha Election 2024
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी काढला रायगडच्या पराभवाचा वचपा? जयंत पाटील यांचा पराभव कशामुळे झाला?

या सर्व्हेतून मतदारांचा कल जाणून घेण्यात आलाय. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) की महायुती कुणाचं सरकार येणार? असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला होता. यावर 48.7 टक्के लोकांनी महायुतीचं सरकार येणार असं मत मांडलंय.

तर 33.1% लोकांनी महायुती पुन्हा सत्तेत येणार असा अंदाज व्यक्त केलाय. 4.9% यापैकी नाही, असं म्हटलंय. तर 13.4% अद्याप ठरलेलं नाही असं उत्तर दिलंय. सकाळ माध्यम समुह आणि साम टीव्हीने महाराष्ट्रातील तब्बल 84 हजार 529 लोकांसोबत संवाद साधून हा सर्व्हे केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील आणि त्यांचेच सरकार स्थापन होईल, असं अनेक मतदारांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडीला 152 आणि महायुतीला 136 जागा मिळणार, असं सर्वेक्षणातील आकडेवारीतून समोर आलं आहे.

ठाकरे गट विधानसभेत किती जागा जिंकणार

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. यापैकी त्यांना केवळ 9 जागांवरच विजय मिळवता आला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला 31 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला 27 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. 95 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील, असं सर्व्हेतून समोर आलंय. तर अजित पवार गटाला (Ajit Pawar) फक्त 18 जागांवरच विजय मिळण्याचा अंदाज आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल 67 आमदार निवडून येतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 41 आमदार निवडून येईल, असं सर्वेक्षणातून समोर आलंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 31 जागांवर उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackery's Shivsena Vidhan Sabha Election 2024
Sakal Election Survey: महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला? शिंदेंचं नाव तिसऱ्या स्थानी; पहिल्या क्रमांकावर कोण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com