कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदान रॅकेट उघड
डॉक्टर आणि एजंटांसह ६ जण अटकेत
कमिशन देऊन रुग्ण आणण्याचा प्रकार समोर
भ्रूण नष्ट करण्यासाठी पैशांची देवाणघेवाण
रणजित माजगावकर, कोल्हापूर
Kolhapur Bidri Illegal Abortion Racket News कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस गडद होत चालला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन महिलांसह चार एजंटांना अटक केली आहे. त्यामुळे संपूर्ण रॅकेटची व्याप्ती अधिक वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इस्पुर्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा दिनकर कांबळे आणि नंदा ईश्वरा गुरव यांच्यासह एजंट बाजीराव तोकडे, विक्रम आनंदा पाटील, सुखदेव पाटील आणि सुनील सदाशिव गुरव यांना अटक करण्यात आली आहे. या आधीच मुख्य आरोपी डॉ. युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांना पोलिसांनी अटक केली होती. तपासात धक्कादायक माहिती समोर येत असून, डॉ. पाटील हा एजंटांना रुग्ण आणण्यासाठी दोन ते पाच हजार रुपयांचे कमिशन देत असल्याचे उघड झाले आहे.
तसेच, गर्भपातानंतर भ्रूण नष्ट करण्यासाठी हॉस्पिटलमधील काही महिलांना पैसे दिले जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकारासाठी राधानगरी तालुक्यासह आसपासच्या भागातून रुग्ण आणले जात असल्याचे जप्त कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी डॉ. युवराज पाटील याच्या मालकीच्या आलिशान फॉर्च्यूनर आणि थार गाड्याही जप्त केल्या आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग उघड होण्याची शक्यता असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.