Pune : पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं; पुण्यात भरतीदरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू

Pune Police Bharti News : पुण्यात पोलीस भरतीदरम्यान १६०० मीटर धावताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर भरती प्रक्रियेतील सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Pune : पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं; पुण्यात भरतीदरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू
Pune Police Bharti IncidentSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात पोलीस भरतीदरम्यान युवकाचा मृत्यू

  • १६०० मीटर रनिंगदरम्यान कोसळला

  • उपचाराआधीच मृत्यू झाल्याची माहिती

  • सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा

  • कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

सागर आव्हाड, पुणे

Pune Police Recruitment Exam Death पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस भरती दरम्यान सोळाशे मीटर रनिंग करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव पुरुषोत्तम बुरकुल असे आहे. दरम्यान त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सदर घटना पुण्यातील शिवाजीनगर ग्राऊंड वरती घडला असून या घटनेने पोलीस भरतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पुरुषोत्तमच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा पोलीस भरती दरम्यान धावण्याची चाचणी देताना एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात देखील सोळाशे मीटर रनिंग करत असताना पुरुषोत्तम बुरकुल या युवकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बुरकुल हा तरुण चौथा राऊंड सुरु असताना अचानक कोसळला.

Pune : पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं; पुण्यात भरतीदरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?

त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेने पोलीस भरतीमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा उमेदवारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच पुरुषोत्तमच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com