Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

Umbarde dumping ground: कल्याण-डोंबिवलीतील उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या पाहणीत आमदार सुलभा गायकवाड यांनी ठेकेदाराच्या कामकाजातील त्रुटींबाबत प्रश्न उपस्थित केले. सुरक्षा साधनांचा अभाव, बालकामगारांचे आरोप आणि सुपरवायझरला मारहाण केल्याच्या दाव्यामुळे चौकशी व संभाव्य कारवाईकडे लक्ष लागले आहे.
Kalyan Dombivli
Kalyan Dombivlisaam tv
Published On: 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उंबरडे डंपिंग ग्राउंडची भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान डंपिंग ग्राउंडवरील ठेकेदाराच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे आरोप करण्यात आले. कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रं आणि आवश्यक सुरक्षा साधनं नसणं, तसंच कचरा वेचण्याच्या कामात बालकांचा समावेश असल्याचं समोर आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे डंपिंग ग्राउंडवरील कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

डंपिंग ग्राउंडमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आवश्यक कागदपत्रंही उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या साधनांचा अभाव आणि वाहनांच्या कागदपत्रांबाबतच्या या आरोपांमुळे ठेकेदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या सर्व बाबींची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवालही उपस्थित होत आहे.

Kalyan Dombivli
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

आमदारांच्या समर्थकाकडून सुपरवायझरला मारहाण

डंपिंग ग्राउंडच्या पाहणीदरम्यान आणखी एक वादग्रस्त प्रकार घडल्याची माहिती समोर आलीये. आमदार सुलभा गायकवाड यांच्या समर्थकांपैकी विजय जोशी यांनी डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला मारहाण केल्याचं सांगण्यात येतंय. सुपरवायझरने मद्यप्राशन केले असल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आल्याची माहितीये.

Kalyan Dombivli
देशात आंदोलनं का होतायत? CJP ला पाठिंबा का मिळतोय? तुषार गांधींनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

विशेष म्हणजे, आमदार सुलभा गायकवाड आणि केडीएमसीचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेचीही चर्चा सुरू झाली आहे.

ठेकेदाराच्या कामावर कारवाई होणार का?

उंबरडे डंपिंग ग्राउंडवरील कामकाजात त्रुटी असल्याचे आरोप गंभीर आहेत. कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रं आणि सुरक्षा साधनं नसणे, वाहनांची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसणं आणि बालकांकडून कचरा वेचण्याचे काम करून घेतलं जात असल्याचा आरोप या बाबींची चौकशी होणं गरजेचं आहे. या प्रकरणात संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुपरवायझरने मद्यप्राशन केलं असल्याचा आरोप करण्यात आला असला तरी त्याची खातरजमा करून नियमानुसार कारवाई करणं अपेक्षित आहे. मात्र या आरोपावरून सुपरवायझरला मारहाण करणं कितपत योग्य आहे, असा सवालही उपस्थित केला जातोय.

Kalyan Dombivli
देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

आता डंपिंग ग्राउंडवरील अनियमिततांची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाणार का? कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार का? तसंच सुपरवायझरला मारहाण केल्याच्या आरोपाची प्रशासन दखल घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com