देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Tushar Gandhi on Protest : महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी देशातील सध्याच्या आंदोलनांना ‘दुसरा स्वातंत्र्य लढा’ असे म्हटलंय. सीजेपी आणि विरोधी पक्षांच्या आंदोलनांबाबत त्यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट कार्यक्रमात आपली भूमिका मांडली.
Tushar Gandhi on democracy and the second freedom movement
Tushar Gandhi on democracy and the second freedom movementsaamtv
Published On: 
Summary
  • तुषार गांधी यांनी देशातील सध्याच्या आंदोलनांना ‘दुसरा स्वातंत्र्य लढा’ असे संबोधले.

  • साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिका मांडली.

  • आंदोलनं सत्ता उलथवण्यासाठी होत आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

देशात होणारी आंदोलनं ही दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी होत आहेत. ही दुसरा स्वातंत्र्याचा संग्रामच आहे, असं विधान महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केलंय. सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत भाष्य करताना तुषार गांधींनी याला स्वातंत्र लढा म्हटलंय. ते साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांना आंदोलन हा स्वातंत्र्य लढा आहे का? हे आंदोलन सत्ता उलटवून टाकण्यासाठी केली जात आहेत का असा प्रश्न करण्यात आला. यावर तुषार गांधींनी ब्लॅक अॅण्ड व्हाईट कार्यक्रमात बेधडक उत्तरं दिली.

Tushar Gandhi on democracy and the second freedom movement
इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

देशातील सत्ता बदलणार-तुषार गांधी

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुषार गांधींनी साम टीव्हीला खास मुलाखत दिलीय. यात त्यांनी स्वातंत्र्य आणि सत्ता बदलाबाबतचं भाष्य केलंय. भारताच्या भवितव्यासाठी बंगालादेश आणि नेपाळ सारखं आंदोलनं होणं हे योग्य असल्याचंही ते यावेळी म्हणालेत. जेव्हा सरकार स्वायक्तिक होत असते आणि लोकांचं ऐकत नाही तेव्हा लोकांकडे दुसरा काही पर्यायच राहत नाही.

Tushar Gandhi on democracy and the second freedom movement
देशात आंदोलनं का होतायत? CJP ला पाठिंबा का मिळतोय? तुषार गांधींनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

त्याच्यात जर थोडीफार अस्थिरता येत असेल तर ती अस्थिरता बरी आहे. परिवर्तन जेव्हा घडत तेव्हा काहीतरी उथलपथल होतेच असते. सामान्य जीवन थोडं विस्कळीत होतेच. परिवर्तन आणि आंदोलनाचा उद्देशही हाच असतो. सामान्य जीवन विस्तकळत नाही झालं तर लोकांना त्याची कल्पना येणार नाही, सरकारही त्याची दखल घेणार नसल्याचं तुषार गांधी म्हणाले.

हा दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा- तुषार गांधी

आपल्या स्वातंत्रता दरम्यान पण ब्रिटिश तेच सांगत होते की, आम्ही कानून व्यवस्था जपून ठेवलीय. तुमचा विकास आम्ही करून देतोय, रेल्वे आणली टेलिग्राफ आणला, शिक्षण आणलं सगळं आणलं, पण त्याच्या सर्वांचा हेतू गुलामी होता. यामुळे त्यावेळेच्या लोकांनी ती जे एक अस्थिरता आली होती ती एक अराजकता आली होती. ती पत्करली आणि सांगितलं आम्हाला आजादी पाहिजे, हे आपल्या स्वतंत्रता संग्रामापेक्षा काहीही कमी नाहीये कारण हा आपल्या लोकांकडून आपल्याला गुलाम बनवायची चेष्टा रोखण्यासाठी हे एक आंदोलन आहे.

हा दुसरा स्वातंत्र्याचा संग्राम आहे कारण, अजूनही 80 वर्ष गेल्यानंतरही आपल्याला बापूंच्या कल्पनेच्या पूर्ण स्वराज्य स्थापित करता आलं नाहीये. जय जयप्रकाश नारायण यांनी जे संपूर्ण क्रांती सांगितली होती, ती संपूर्ण क्रांती अजूनही अपूर्ण आहे. म्हणून आपली जे व्यवस्था आहे जे विस्कळीत होतेय. जे सत्ता केंद्रित होऊन राहिली आहे त्या व्यवस्थेला बदलून एक सच्ची लोकशाही व्यवस्था आणायची आहे, हा संग्राम स्वतंत्रता संग्रामापेक्षा काहीही कमी महत्त्वाचा नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com