

देशातील राजकीय आंदोलनांमागील कारणांवर चर्चा सुरू आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त आणि भाजपविरोधात आंदोलन होत आहेत.
सीजेपीने लोकांचा विश्वास जिंकल्याचा दावा तुषार गांधी यांनी केला
देशातील राजकीय पक्षांविषयी एक उदासीनता आलेली दिसत होती. आमदार-खासदारांच्या विश्वासर्हतेवर संशय येऊ लागला होता. त्याचदरम्यान सीजेपीसारख्या पक्षानं लोकांचा विश्वास जिंकलाय. त्यामुळे पक्षांना नवी चेतना मिळाल्याचा दावा महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी म्हणालेत. तुषार गांधी हे साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमात बोलत होते.
देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त आणि भाजपविरोधात आंदोलनं सुरूय. कॉक्रोच जनता पक्षाकडून दिल्लीमध्ये आंदोलन पुकारण्यात आलं होतं.आज इंडिआ आघाडीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढलाय. दरम्यान देशभरात अशी आंदोलनं का होतायत? कॉक्रोच जनता पक्षाला लोकांचा पाठिंबा का मिळतोय? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेन. या प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधींनी दिलेत.
नागरिकांमध्ये राजकीय पक्षांविषयी एक उदासीनता आलेली दिसत होती. राजकीय पक्षांना ज्या पद्धतीने प्रतिसाद भेटायला पाहिजे, होता तसा दिसत नव्हतं. दुसरं जे आपले खासदार आणि आमदार होते त्यांची ज्या पद्धतीने खरेदी होत होत होती. त्या पद्धतीने लोकांना पक्षांमधील शिस्तीवर अविश्वास येऊ लागला होता. पक्षांमधली जे एक आस्था असायला पाहिजे, प्रामाणिकपणा असायला पाहिजे त्याच्यापेक्षा त्यांचा संशय येऊ लागला होता. यामुळे राजकीय पक्ष उदासीन झाले होते. हा तरुण पर्याय पुढे आला आणि हे दिसलं की ते जे बोलतात ते करतायत त्यांनी फक्त घोषणा केली नाही. कॉक्रोच जनता पार्टी रस्त्यावर उतरलीय.
आम्ही स्वतः फ्रंट लाईनमध्ये असू हा विश्वास कॉकोच जनता पार्टीबरोबर आला. जंतरमंतरवर त्यांनी हा विश्वास दाखवला की ह्या संघर्षाच्या ठिकाणी आम्ही असू. आमची लोक असतील तुम्ही आम्हाला पाठिंबा करायला या. तेव्हा जंतरमंतरवर लोक पोहोचली. देशव्यापी आंदोलन झालं ते विश्वास कॉकोच जनता पार्टीच्या युवकांनी आणि आजच्या युवकांनी हा विश्वास जिंकला.
म्हणून जंतर मंतरमध्ये पण आपल्याला दिसतं की फक्त मुंबईला दिल्लीलाच नाही मुंबईला पण जनतेचा प्रतिसाद किती मोठ्या प्रमाणात मिळला. आज त्याच्यामुळे लोकांचा जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या प्रतीपण एक आस्था नवीन रूपाने परत जागृत होताना दिसतेय.
आज शिवसेनेचा कॉल होता शिवसेनेच्या कॉल मध्ये पण मुंबईकरांनी भरपूर प्रतिसाद दिला दिसून येत आणि म्हणून सरकार आता पोलीसच दमन शस्त्र वापरून नागरिकांच्यावरती अत्याचार करत आहे. मुंबई पोलिसांसाठी मी हे सांगू इच्छितो की मुंबई पोलीसनी आपली गौरवपूर्ण कार्य कीर्ती होती त्याच्यावरती शेण लावलंय.
अगदी मुळात तुषारजीशी चर्चा केल्यानंतर आपण या पूर्ण चर्चेचा सार काय काढू शकतो तर तुम्ही ज्यावेळेला विरोधक राजकीय प्रक्रियेतला विरोधक संपवून टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला तिसरी शक्ती उभी राहते आणि ती रस्त्यावरची असते. सीजेपी ही तिसरी शक्ती आहे जर विरोधकांना योग्य स्थान लोकशाहीत मिळालं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती. संसदेत प्रश्न मांडले गेले असते तर आज ही परिस्थिती आली नसती न्यायालयातून न्याय मिळाला असता तर ही परिस्थिती आली की नसती असं तुषार गांधी म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.