जामनेर (जळगाव) : पती आणि पत्नीमध्ये रोजच वाद होत होते. याच वादातून पतीने पत्नीसह अकरा महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली. यानंतर पतीने दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन (Jalgaon) जीवनयात्रा संपविली. हि धक्कादायक घटना जामनेर (Jamner) तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे १२ एप्रिलला घडली. (Breaking Marathi News)
देऊळगाव गुजरी (ता. जामनेर) येथील पोलिस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके याच्याशी झाला होता. पतीला मद्याचे व्यसन असल्यामुळे पती- पत्नीमध्ये नेहमी (Crime News) वाद होत. परंतु पतीचे दारूचे व्यसन जास्तच झाल्यामुळे प्रतिभा पतीला सोडून अकरा महिन्याच्या मुलीला सोबत घेऊन माहेरी निघून आली होती. मध्यंतरी विशालने प्रतिभाची समजूत घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. परंतु प्रतिभाने त्यास नकार दिला होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान प्रतिभाचे आई-वडील शेतात गेले असताना विशाल प्रतिभाला घेऊन जाण्यासाठी व तिची समजूत काढण्यासाठी आला असता प्रतिभाने नकार दिला. या मुळे दोघांमध्ये वाद झाला. यातून विशालने धारदार शस्त्राने प्रतिभा व मुलगी दिव्या या दोघींचा गळा चिरून हत्या करून तिथून फरार झाला. प्रतिभाच्या आई, वडिलांना माहिती मिळताच त्यांनी घरी धाव घेतली. त्यांना आपली मुलगी व नात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दिसून आले.
गावी येत घेतली विहरीत उडी
पत्नी व चिमुकल्या मुलीची हत्या करून पती विशाल हा आपल्या मूळ गावी दुधगाव येथे आला. यानंतर कमरेला दगड बांधून त्याने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. या सर्व घटनेचा तपस फत्तेपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश फड आणि तडवी आदी तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.