Jalgaon News : कुलर चालू करायला गेली व जीव गमावला; विजेच्या जोरदार झटक्याने चिमुकलीचा मृत्यू

Jalgaon News : उन्हामुळे दुपारी गरम होत असल्याने घरामध्ये लावलेला पत्र्याचा कुलर सुरू करण्यासाठी अक्षदा ही गेली.
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णता व गर्मी वाढली आहे. यामुळे घराघरात कुलरचा वापर देखील वाढला आहे. (Jalgaon) अशाच प्रकारे दुपारच्या सुमारास कुलर सुरु करताना विजेचा जोरदार झटका बसून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू (Death) झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील किनोद या गावी घडली. (Tajya Batmya)

Jalgaon News
Sambhajinagar News : अश्लील व्हिडीओ पाहिल्याचे सांगत सायबर गुन्हेगाराकडून ब्लॅकमेलिंग; शेकडो जणांना मेलद्वारे धमकी

किनोद (ता. जळगाव) येथे आई व दोन बहिणींसह वास्तव्यास असलेली अक्षदा किशोर मोरे (वय १२) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. उन्हामुळे दुपारी गरम होत असल्याने घरामध्ये लावलेला पत्र्याचा कुलर सुरू करण्यासाठी अक्षदा ही गेली. तिने कुलर सुरु करण्यासाठी बटन सुरू करत असताना तिला विजेचा जोरदार धक्का (Electric Shock) लागल्याने ती फेकली गेली. घरात असलेल्या तिच्या आईला हा प्रकार दिसताच तिने आरडाओरड केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon News
Latur News : दोन एकर केळी बाग वादळी वाऱ्याने भुईसपाट; दुष्काळी परिस्थितीत शेकऱ्यावर संकट 

आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावून आले. यानंतर अक्षदाला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) आणले. येथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com