Maharashatra Election: नरेंद्र मोदींच्या माध्यमातून समाजामधील सर्व घटकांना लाभ मिळाला: रक्षा खडसे

Maharashatra Election Raksha Khadse : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ चोपड्यात महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात भाजपने केलेल्या विकासकामांची माहिती दिली.
Raver Raksha Khadse
Raver Raksha Khadse RNO

(RNO)

जळगाव: रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ चोपड्यात महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, समाजामधील एकही घटक असा नसेल की, ज्यांच्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून काम झालेलं नाही. ग्रामीण भागामध्ये घरकुल असेल, शौचालय असेल, मोफत धान्य, अशा विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना लाभ मिळाल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या. (Latest News)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालाय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. यंदाची निवडणूक मोदी पर्वात झालेली कामे आणि विकास घडवण्यात अपयशी ठरलेले मोदी याच मुद्द्यावरून होताना दिसत आहे. सत्ताधारी मोदींनी कोण-कोणती कामे केली याची माहिती दिली जात आहे. तर विरोधकाकडून पंतप्रधान कसा एकाधिकारशाही चालवत आहेत. विकास घडवण्यात मोदी कसे अपयशी ठरलेत, असा घणाघात केला जात आहे.

याची प्रचिती रावेरमधील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी घेतलेल्या प्रचार मेळाव्यात आली. चोपड्यात घेतलेल्या प्रचार्थ मेळाव्यात रक्षा खडसे यांनी मोदींनी केलेल्या कामांची माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकातील लोकांना घरकुल असेल, शौचालय असेल, मोफत धान्य असेल, बचत गटाच्या माध्यमातून योजनांचा लाभ मिळालाय.

ग्रामीण भागामध्ये घरकुल असेल, शौचालय असेल, मोफत धान्य असेल, बचत गटाच्या माध्यमातून योजना असतील. आज प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी केले आहे, असं रक्षा खडसे म्हणालेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बराचसा निधी उपलब्ध केला जातो, असे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांनी सांगितले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये काही घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अनुपस्थिती दिसत होती. या कार्यक्रमामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमणध्वनी वरुन मार्गदर्शन केले आहे.

Raver Raksha Khadse
Sushma Andhare: तडस प्रकरणामुळे सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढल्या; राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com