Shirpur Accident : मजुरांनी भरलेली गाडी उलटली; मुलीचा मृत्यू, १९ जखमी

Dhule News : मजूर मध्यप्रदेशातील कोलकी (जि. बडवानी) येथील रहिवाशी आहेत. मजुरीचा हंगाम आटोपून दीड महिन्यानंतर सर्वजण घराकडे निघाले होते.
Shirpur Accident
Shirpur AccidentSaam tv

शिरपूर (धुळे) : मजुरांनी भरलेला ट्रकचा टायर फुटल्याने भरधाव ट्रक पलटी झाला. यामुळे झालेल्या अपघातात (Accident) एका मुलीचा मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले आहेत. सदर अपघात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर घडला. (Maharashtra News)

Shirpur Accident
Latur News : दोन एकर केळी बाग वादळी वाऱ्याने भुईसपाट; दुष्काळी परिस्थितीत शेकऱ्यावर संकट 

मुंबई- आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) दभाशी (ता. शिंदखेडा) जवळ हा अपघात घडला. अपघातात जखमी झालेले मजूर मध्यप्रदेशातील कोलकी (जि. बडवानी) येथील रहिवाशी आहेत. मजुरीचा हंगाम आटोपून दीड महिन्यानंतर सर्वजण घराकडे निघाले होते. दरम्यान दभाशी फाट्याजवळ (Shirpur) पिकअपचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन उलटले. यात बानाबाई रामदास पावरा (वय १५) या मुलीचा मृत्यू (death) झाला आहे. दरम्यान, महामार्ग पोलिसांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shirpur Accident
Jalgaon News : कुलर चालू करायला गेली व जीव गमावला; विजेच्या जोरदार झटक्याने चिमुकलीचा मृत्यू

जखमींना रुग्णालयात केले दाखल 

अपघातात जखमींमध्ये साजन पावरा (वय १०), कविता पावरा (वय ६), सायना पावरा (वय १०), रेखा पावरा (वय ३०), रोशनी पावरा (वय १६), टिल्या पावरा (वय ७), रितीक पावरा (वय २४), भाईसिंह पावरा (वय २४), सपना पावरा (वय १५), सजनी पावरा (वय दीड वर्ष), पूजा पावरा (वय ३०), साजन पावरा (वय ४), पिंकी पावरा (वय ३५), ईचल्या पावरा, पार्वती पावरा, रेखाबाई पावरा, अश्‍विन पावरा (वय ४), रुमालसिंह पावरा, दिनेश पावरा (सर्व रा.कोलकी) यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल जैन व सहकाऱ्‍यांनी तातडीने उपचार केले. ९ गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com