Bhandara Accident: भरधाव ट्रॅकच्या धडकेत शिक्षिका ठार, भंडारा जिल्ह्यात हळहळ

Bhandara Accident Teacher Death: भंडारा जिल्ह्यामध्ये भरधाव ट्रॅकच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षिका ठार झाली आहे. ही घटना लाखनी पंचायत समिती समोर घडली आहे.
Bhandara Accident
Bhandara Accident Saam Tv

शुभम देशमुख साम टीव्ही, भंडारा

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यामध्ये भरधाव ट्रॅकच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षिका ठार झाली आहे. ही घटना लाखनी पंचायत समिती समोर घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे. ट्रकने दिलेल्या धडकेमध्ये शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरला अनमोल फुलसुंगे (वय ४०) असं मृत शिक्षिकेचं नाव आहे. सरला फुलसुंगे कामे आटोपून त्यांच्या दुचाकीवरून घराकडे जात होत्या. त्यावेळी भरधाव (Bhandara Accident Teacher Death) वेगात पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे सरला अनमोल फुलसुंगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही भीषण अपघाताची घटना आज लाखनी येथील पंचायत समितीसमोर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. सरला फुलसुंगे या युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल गडेगाव - (लाखनी) येथे शिक्षिका या पदावर कार्यरत होत्या. दरम्यान काही कामे आटोपून त्या दुचाकीवरून (Bhandara Accident) घरी जात होत्या. तेव्हा त्यांनी त्यांच्या दुचाकीचा वेग पंचायत समितीसमोर असलेल्या गतिरोधकावर दुचाकीचा वेग कमी केला.

याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक ( Accident News) दिली. यामध्ये शिक्षिका जागीच गतप्राण झाली. त्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका होत्या. या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhandara Accident
Tamilnadu Accident CCTV Footage: भरधाव रस्त्यावर धावणारी कार हवेत उडाली अन् तीन वेळा उलटली, CCTV फुटेज व्हायरल

नाशिक पुणे महामार्गावर अपघात

नाशिक पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसचा आज भीषण अपघात झाला आहे. ही खासगी ट्रॅव्हल बस सिन्नरजवळ गोंदे फाट्यावर उड्डाणपुलावरून खाली कोसळली आहे. पहाटे ६ वाजेदरम्यान हा अपघात (Accident) झाला. ५ ते २० प्रवासी जखमी तर एक प्रवासी गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. खासगी ट्रॅव्हल बस पुण्यावरून नाशिकच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला आहे.

Bhandara Accident
Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com