Tamilnadu Accident CCTV Footage: भरधाव रस्त्यावर धावणारी कार हवेत उडाली अन् तीन वेळा उलटली, CCTV फुटेज व्हायरल

Accident CCTV Footage Viral: भरधाव रस्त्यावर धावणारी कार हवेत उडाली, दोन ते तीन वेळेस पलटी झाल्याचं देखील दिसत आहे. तामिळनाडूतील मदुराई येथे हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.
Tamilnadu Accident
Tamilnadu AccidentSaam Tv

तामिळनाडूमध्ये एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव रस्त्यावर धावणारी कार हवेत उडाली, दोन ते तीन वेळेस पलटी झाल्याचं देखील दिसत (Accident CCTV Footage Viral) आहे. तामिळनाडूतील मदुराई येथे हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तामिळनाडूतील मदुराई येथे झालेला भीषण अपघात कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. महामार्गावर धावताना वेगामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार उलटली. या अपघातात एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू (Accident CCTV Footage) झाला. मृतांपैकी चार जण एकाच कुटुंबातील होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

तामिळनाडूतील मदुराई येथील विरुधुनगर-मदुराई महामार्गावर हा अपघात (Tamilnadu Accident) झाला. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहणाऱ्याला मोठा धक्काच बसत आहे. एक पांढऱ्या रंगाची गाडी डाव्या लेनमधून हळू चालणाऱ्या दुचाकीच्या मागे वेगाने जात असल्याचे दिसून (Accident News) येते. गाडी आधी मोपेडला धडकली आणि नंतर काँक्रीटच्या दुभाजकाला धडकली.

पुढे गेल्यावर ही गाडी हवेत (viral) उडते. महामार्गाच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला आदळल्यानंतर गाडी महामार्गाच्या इतर मार्गावरून जाते. तिथल्या सर्व्हिस लेनवर पोहोचते. यादरम्यान कार हवेत तीन वेळा पलटी होताना देखील दिसते. व्हिडिओ फुटेजमध्ये सर्व्हिस लेनवर मोटारसायकलवर (viral news) स्वार झालेला एक व्यक्तीही दिसत आहे.

Tamilnadu Accident
Viral Video: भरधाव कारच्या विंडोमधून ती सेल्फी घेत होती; हवेच्या वेगाने फोनच उडाला, पाहा व्हिडिओ

एएनआयने वरिष्ठ मदुराई पोलीस अधिकारी अरविंद यांच्या हवाल्याने (viral video) सांगितले की, अपघातात मरण पावलेले एकाच कुटुंबातील चार सदस्य मदुराईमधील विलापुरमचे रहिवासी होते. ही भीषण अपघाताची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. तर गाडी अगदी चक्काचूर झाली आहे. सोशल मीडियावर वाहनांच्या अपघातांचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. हा देखील असाच काळजात धडकी भरवणारा अपघात आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.

Tamilnadu Accident
Songir Accident : महामार्ग दुरुस्ती करणाऱ्या मजुरांना भरधाव डंपरने उडविले; एकाच मृत्यू, मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com