Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली

Accident News : खासगी ट्रॅव्हल बस पुण्यावरून नाशिकच्या दिशेने येत असताना पहाटे ६ वाजेदरम्यान हा अपघात झाला. अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी तर एक प्रवासी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Nashik Accident
Nashik AccidentSaam Tv

अभिजीत सोनवणे

Bus Accident:

नाशिक पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे. सिन्नरजवळ गोंदे फाट्यावर खासगी ट्रॅव्हल बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली आहे. खासगी ट्रॅव्हल बस पुण्यावरून नाशिकच्या दिशेने येत असताना पहाटे ६ वाजेदरम्यान हा अपघात झाला.

Nashik Accident
Nashik Onion News: कांदा लिलावावरून येवला बाजार समितीत हाणामारी; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, पाहा Video

मिळालेल्या अधिक महितीनुसार, अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी तर एक प्रवासी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मालवाहू वाहनास अपघात, 15 वर्षाची मुलगी ठार

अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील बाभळे फाटा येथे काल मोठा अपघात झाला. मालवाहू वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत पंधरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर वीस ते पंचवीस मजूर अपघातामध्ये जखमी झाले आहेत.

नगर- कल्याण रोडवर भीषण अपघात

१३ एप्रिल रोजी अहमदनगरमध्ये देखील एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. नगर - कल्याण रोडवर कर्जुले हद्दीमध्ये पहाटे पाच वाजता पिकअपचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Nashik Accident
Kalyan News: कल्याणमध्ये विद्यार्थी-तरुण ड्रग्जच्या विळख्यात, महिलेला अटक करत साडेपाच लाखांची ब्राऊन शुगर जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com