

भुसावळमध्ये दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांचा तरुणावर गोळीबार
जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये गोळीबाराची घटना
फुलगाव उड्डाणपुलाखाली तरुणावर गोळी झाडून हल्लेखोर फरार
भुसावळ तालुक्यातील फुलगाव उड्डाणपुलाखाली आज रात्री आठच्या सुमारास वरणगाव शहरात एका २३ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरफराज मुक्ताईनगर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली असून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी सरफराजवर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. जखमी सरफराजला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरामध्ये सायंकाळी गोळीबाराची थरारक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर शहरातील काजीपुरा परिसरातील २३ वर्षीय सरफराज सय्यद या तरुणावर गोळीबार करण्यात आला. तो एका कंपनीत डंपर चालक म्हणून काम करतो. कामाच्या निमित्ताने तो वरणगाव परिसरात आला होता. अचानक झालेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य किंवा अन्य कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच वास्तव समोर येईल, असे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.