

गुवाहाटीतील बोरा सर्व्हिस परिसरात गोळीबाराची घटना
या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले
आसामची राजधानी गुवाहाटीच्या बोरा सर्व्हिस परिसरात गोळीबाराची घटना घडलीय. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झालाय. तर काही जण जखमी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी शहरातील हॉटेल बिलास इनमध्ये २६ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास बेछुटपणे गोळीबार झाल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून गोळीबार केला.
या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. हॉटेलमध्ये आणि परिसरामध्ये मृतदेह आढळून आले आहे. मृतांमध्ये एक तरुणी आणि २ महिलांचा समावेश आहे. गोळीबार करून हल्लेखोर फरार झालेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी गुवाहाटी पोलीस आयुक्त पार्थ सारथी महंत पोहोचले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पोलीस घटनेचा तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.