Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील कॅम्प क्रमांक चारमध्ये भरदिवसा गोळीबार झाला. या घटनेत हरीश गजवानी यांचा मृत्यू झाला असून जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
Ulhasnagar Firing: Harish Gajwani Shot Dead Near Railway Station
Ulhasnagar Firing: Harish Gajwani Shot Dead Near Railway Station
Published On: 
Summary
  • उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भरदिवसा गोळीबार

  • कॅम्प क्रमांक चारमध्ये गोळीबारात हरीश गजवानी यांचा मृत्यू

  • हरीश गजवानी हत्या प्रकरणात जुन्या वादाचा संशय

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबाराचा थरार घडला. रेल्वे स्टेशन परिसरातील कॅम्प क्रमांक चारमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात हरीश गजवानी यांची हत्या करण्यात आली. जुन्या वादाच्या कारणावरून त्यांच्यावर गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे. वर्दळीच्या रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या या हत्येमुळे संपूर्ण उल्हासनगर शहरात प्रचंड खळबळ आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

अज्ञात हल्लेखोरांनी हरीश गजवानी यांच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. डोक्यात गोळी शिरताच गजवानी रक्ताच्या थारोळ्यात पडले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरीश गजवानी हे कॅम्प क्रमांक चार परिसरात होते, त्यावेळी हल्लेखोर त्यांच्या दिशेने आले. कोणताही संवाद न साधता अत्यंत थंड डोक्याने हल्लेखोराने पिस्तूल रोखत गजवानी यांच्या डोक्यावर एकापाठोपाठ दोन गोळ्या झाडल्या.

Ulhasnagar Firing: Harish Gajwani Shot Dead Near Railway Station
बहीण भावाच्या नात्याला काळिमा! वारंवार अत्याचार केल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

गोळीबाराचा कानठळ्या बसवणारा आवाज होताच परिसरातील नागरिकांची आणि प्रवाशांची एकच पळापळ झाली. गंभीर जखमी झालेले गजवानी जागेवरच कोसळले. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी; सीसीटीव्हीची तपासणी सुरू

घटनेचे वृत्त समजताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) शंकर अवताडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय.

Ulhasnagar Firing: Harish Gajwani Shot Dead Near Railway Station
Mumbai : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; चेंबूरमधून दोघांना अटक

ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाली, की आर्थिक देवाणघेवाणीतून अथवा गँगवॉरच्या पार्श्वभूमीवर झाली, या सर्व शक्यतांच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. हल्लेखोरांचा सुगावा लावण्यासाठी परिसरातील सर्व दुकाने आणि इमारतींचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com