Mumbai : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; चेंबूरमधून दोघांना अटक

Mumbai News : मुंबईतील चेंबूरमध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई. दोन आरोपींना अटक करून ३३१.४९ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. जप्त ड्रग्जची अंदाजे किंमत १० लाख १४ हजार ४७० रुपये.
Mumbai Police News
Mumbai Police News Saam tv
Published On: 
Summary
  • मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई

  • फेड्रॉनच्या कथित तस्करीप्रकरणी दोन जणांना अटक

  • अंमली पदार्थाचा स्रोत आणि संभाव्य पुरवठा साखळी शोधण्याचे काम सुरू

संजय गडदे, मुंबई

मुंबईत अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मोठी कारवाई केली आहे. चेंबूर परिसरात मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत आरोपींकडून एकूण ३३१.४९ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारातील अंदाजे किंमत १० लाख १४ हजार ४७० रुपये असल्याची माहिती आहे. १४ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

चेंबूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटला चेंबूर येथील आर.सी. मार्ग परिसरात दोन व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर लक्ष ठेवून त्यांची अंगझडती घेतली. या तपासणीदरम्यान त्यांच्याकडे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील अंमली पदार्थ जप्त केला.

Mumbai Police News
Face Shaving : फेस शेविंगमुळे मुलींच्या चेहऱ्यावर केस जाड येतात? डर्मेटोलॉजिस्ट काय सांगतात?

दोघांकडून ३३१ ग्रॅमपेक्षा अधिक एमडी जप्त

या कारवाईत पहिल्या आरोपीकडून ११७.५८ ग्रॅम, तर दुसऱ्या आरोपीकडून २१३.९१ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे दोन्ही आरोपींकडून एकूण ३३१.४९ ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत १० लाख १४ हजार ४७० रुपये आहे. या प्रकरणामुळे चेंबूर परिसरातील अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Mumbai Police News
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी गुन्हा क्रमांक ९६/२०२६ नुसार दोन्ही आरोपींविरोधात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायदा (एनडीपीएस कायदा), १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आरोपी हे अंमली पदार्थ कुठून आणत होते आणि त्याचा पुरवठा कोणाला केला जाणार होता याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com