Alisha Khedekar
काही महिलांच्या चेहऱ्यावर दाट छोटी केस दिसतात. हे केस चेहऱ्यावर आलेला घाम शोषून घेतात आणि कालांतराने त्या घामातून इन्फेक्शन होऊन बारीक फोड्या येतात.त्यामुळे फेस शेविंग करणे महत्त्वाचे.
नाही! चेहऱ्यावरील केस शेव केल्याने ते प्रत्यक्षात जाड, काळे किंवा अधिक वेगाने वाढत नाहीत.पण फेस शेविंग करणे महत्त्वाचे कारण त्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते.
शेविंग करताना केसांचा वरचा भाग सपाट कापला जातो. त्यामुळे पुन्हा उगवणारे केस थोडे खरखरीत वाटतात.
चुकीच्या पद्धतीने शेविंग केल्यास त्वचेवर लालसरपणा, जळजळ, लहान कट्स किंवा मुरुमांसारखी समस्या निर्माण होऊ शकते.
चेहऱ्यासाठी खास तयार केलेला स्वच्छ, धारदार रेझर वापरा. तो इतरांसोबत शेअर करणे टाळा.
चेहरा स्वच्छ करा आणि त्वचेला योग्य पद्धतीने फेस क्रीम लावून मॉलिश करा. त्यानंतर रेझर हलक्या हाताने केसांच्या वाढीच्या दिशेने फिरवा.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा