Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

Firing On Former Corporator: पाटण्यातील बुद्ध कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, प्रभाग क्रमांक २४ च्या नगरसेविका ज्ञानवती देवी यांचे पती अनिल यादव यांच्यावर समाजकंटकांनी बेछूट गोळीबार केला.
Firing On  Former Corporator:
Former councillor Anil Yadav shot in Buddha Colony Patnasaam tv
Published On
Summary
  • पाटण्यातील बुद्ध कॉलनीमध्ये माजी नगरसेवक अनिल यादव यांच्यावर गोळीबार

  • जन सुराज नगरसेविका ज्ञानवती देवी यांच्या पतीवर गोळीबार

  • माजी नगरसेवक अनिल यादव यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याची माहिती

पाटणामधील बुद्ध कॉलनीमध्ये जन सुराज पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीवर गोळीबार झाल्याची घटना घडलीय. ज्ञानवती देवी असं जन सुराज पक्षाच्या नगरसेविकेचं नाव असून त्यांचे पती माजी नगरसेवक अनिल यादव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानं परिसरात खळबळ उडालीय. गेल्या काही दिवसापासून बिहारची राजधानी पाटण्यात गुंडांनी धुमाकूळ घातलाय. दररोज गुन्ह्याची घटना घडत असल्यानं गुंडांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचं चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल यादव हे त्यांच्या 'मा सुखिया महल' या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या पार्किंग परिसरात बसले होते. तेव्हा दोन दुचाकीवरून आलेल्या तीन बुरखाधारी हल्लेखोर तेथे आले. त्यावेळी अनिल यादव यांना परिस्थितीचा अंदाज येण्याआधीच हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. अनिल यादव यांना चार ते पाच गोळ्या लागल्या, ज्यामुळे ते जागीच कोसळले. गोळीबारानंतर तिन्ही हल्लेखोरांनी हवेत बंदुका मिरवत घटनास्थळावरून पळ काढला.

Firing On  Former Corporator:
देहूगावात थरार! शेतजमिनीच्या वादातून गरोदर पत्नीचा खून; पतीने इमारतीवरून मारली उडी, संपूर्ण परिसर हादरला

प्रशांत किशोर यांनी घेतली भेट; माजी नगरसेवकाची प्रकृती चिंताजनक

गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि कुटुंबीयांनी अनिल यादव यांच्याकडे धाव घेतली. त्यांना तातडीने बोरिंग रोडवरील 'उदयन हॉस्पिटल'मध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अनिल यादव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ते आयसीयू (ICU) मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत.

Firing On  Former Corporator:
मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अडीच तास उशिराने

या घटनेची माहिती मिळताच, जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी अनिल यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उदयन् रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com