मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

Lonavala-Pune Railway Traffic Disrupted : मळवली-कामशेतदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. लोकलसह लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना दोन ते अडीच तासांचा विलंब झालाय.
Lonavala-Pune Railway Traffic Disrupted
Malavli Kamshet railway route affected by freight train breakdownsaam tv
Published On
Summary
  • मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लोणावळा पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

  • मळवली कामशेतदरम्यान मालगाडी बंद पडल्याने लोकल एक्स्प्रेसला विलंब

  • लोणावळा पुणे रेल्वे मार्गावर गाड्या अडीच तास उशिराने

दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी

मळवली-कामशेतदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी सायंकाळी लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मालगाडी मार्गातच बंद पडल्याने मागून येणाऱ्या लोकल तसेच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. अनेक गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मळवली रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गावर गाड्यांची वाहतूक खोळंबली. या घटनेचा परिणाम मुंबई-पुणे मार्गावरील प्रवासी वाहतुकीवरही झाला.

Lonavala-Pune Railway Traffic Disrupted
वारकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील भजनी मंडळांना मिळणार अनुदान, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस, सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस यांसह विविध लोकल गाड्यांना दोन ते अडीच तासांचा विलंब झाला. त्यामुळे लोणावळा, मळवली, कामशेत आणि तळेगाव रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून मालगाडीतील तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरू असून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, विलंबाबाबत प्रवाशांना वेळेवर माहिती न मिळाल्याने स्थानकांवर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com