

जळगावात 'लाचेचा' कारभार पाहायला मिळतोय
वर्ग-१ चा उपनिबंधक दीड लाखांची लाच घेताना अडकला
खासगी एजंटसह 'एसीबी'च्या जाळ्यात
संजय महाजन, साम टीव्ही
राज्यातील विविध भागात भ्रष्टाचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला शहरात वन विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली होती. त्यानंतर आता जळगावतही एक क्लास वन अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडला. या अधिकाऱ्यासहित एजंटलाही पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जळगावमधील लाचखोर उपनिबंधक जगदीश बारी आणि खासगी एजंट देविदास पाटील याला जळगावमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलं आहे. या अधिकाऱ्याने अवैध सावकारीच्या प्रकरणात अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क ५ लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर एसीबीने उप निबंधक सह संस्था (वर्ग-१) चे अधिकारी जगदीश बाबुराव बारी आणि त्याचा खाजगी एजंट देविदास पाटील या दोघांना लाच घेताना ताब्यात घेतलं.
जळगाव एसीबीने १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ अटक केली आहे. बी. जे. मार्केटमधील जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात आज बुधवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे जळगावच्या सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
येवला वनविभागाचे ८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
नाशिकच्या येवला शहरामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. या दरम्यान आता येवला वन विभागाच्या कार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांवर एसीबीच्या पथकाने छापा मारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सागाच्या झाडांची तोडायच्या परवानगीसाठी लाच मागितली होती.
नाशिकच्या एसीबीने पथकाने ही कारवाई पोलीस निरीक्षक पुनम केदार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. यावेळी पथकाने आठ आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहेच. या कर्मचाऱ्यांनी नेमकी किती रुपयांची लाच मागितली, हे मात्र समजू शकलेले नाही. त्यामुळे कारवाई पूर्ण झाल्यावरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.