Nashik : प्रशासकीय विभागात खळबळ! बड्या अधिकारीला लाच घेताना रंगे हाथ पकडलं; असा उधळला डाव

Nashik Bribe News : नाशिकच्या चांदवड तालुक्यात महसूल विभागातील महिला मंडळ अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे विभागात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात कडक संदेश गेला आहे.
NASHIK ACB TRAP: WOMAN REVENUE OFFICER CAUGHT TAKING ₹50,000 BRIBE
NASHIK ACB TRAP: WOMAN REVENUE OFFICER CAUGHT TAKING ₹50,000 BRIBESaam Tv
Published On
Summary
  • चांदवडमध्ये एसीबीची मोठी कारवाई

  • ५० हजारांची लाच घेताना महिला अधिकारी अटकेत

  • न्यायालयीन आदेशासाठी लाच मागितल्याचा आरोप

  • महसूल विभागात खळबळ आणि भीतीचे वातावरण

नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. चांदवड तालुक्यातील महसूल विभागात मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. योगिता आनंद भोये (वय ३८) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची खडक ओझर (ता. चांदवड) शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीच्या ताब्याबाबत काही व्यक्तींशी वाद निर्माण झाल्याने तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सुनावणीदरम्यान तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत महसूल विभागाला संबंधित जमिनीचा ताबा देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.

NASHIK ACB TRAP: WOMAN REVENUE OFFICER CAUGHT TAKING ₹50,000 BRIBE
Crime News : पत्नी आणि मेव्हुणीनं गळा दाबून खून केला, साडूनं शेतात मृतदेह लपवला; बीडमधील हत्याकांडानं अख्खं राज्य हादरलं

यानंतर तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी योगिता भोये यांना न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करून तक्रारदाराला जमिनीचा ताबा मिळवून देण्याचे निर्देश दिले. मात्र, या प्रक्रियेसाठी भोये यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. स्वतःसाठी आणि खडक ओझर सजाच्या तलाठ्यासाठी मिळून ६० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. चर्चेनंतर ही रक्कम ५० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

NASHIK ACB TRAP: WOMAN REVENUE OFFICER CAUGHT TAKING ₹50,000 BRIBE
Shocking : २१ वर्षाच्या तरूणीला बॉयफ्रेंडने जिवंत जाळले, कुटुंबियांनीही केली मदत, कारण वाचून थरकाप उडेल

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने नाशिक येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. नियोजितप्रमाणे तक्रारदाराने ५० हजार रुपयांची रक्कम देताच, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ छापा टाकून योगिता भोये यांना रंगेहात अटक केली.

NASHIK ACB TRAP: WOMAN REVENUE OFFICER CAUGHT TAKING ₹50,000 BRIBE
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. एसीबीच्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरोधात कडक संदेश गेला असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com