Jalgaon Accident : कारवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळली; अपघातात चालकाचा मृत्यू, एकजण जखमी

Jalgaon News : बँकेच्या कामानिमित्त जळगावला आले होते. काम आटोपल्यानंतर गावाकडे जात असताना चिंचपुऱ्याजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली व कार दोन वेळा उलटली
Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv

जळगाव : महामार्गाने सुसाट जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून अपघात (Accident) झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेल्या एकाला छातीला (Jalgaon) जबर दुखापत झाली आहे. हा अपघात जळगाव- धरणगाव रोडवर मुसळी ते चिंचपुरा गावादरम्यान घडला.  (Tajya Batmya)

Jalgaon Accident
Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; डॉक्टराची २० लाखांत फसवणूक

सार्वे बुद्रुक (ता. धरणगाव) येथील राज महेंद्र शिरसाट (वय १९) हा धरणगावच्या (Dharangaon) कला-वाणिज्य महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवीचे शिक्षण घेत होता. ४ एप्रिलला दुपारी राज शिरसाट व कीर्तनकार सुरेश अहिरे महाराज हे कारने बँकेच्या कामानिमित्त जळगावला आले होते. काम आटोपल्यानंतर गावाकडे जात असताना चिंचपुऱ्याजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली व कार दोन वेळा उलटली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Jalgaon Accident
Onion Harvesting : कांदा काढणीला वेग; भाव वाढीच्या अपेक्षेने चाळीत साठवणूक

एकुलता एक मुलगा गेला 

या अपघातात कारचालक राज शिरसाट जागीच ठार झाला. तर सार्वेकर महाराज गंभीर जखमी झाले आहेत. शिक्षक डी. के.पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने कारमधून सार्वेकर महाराजांना व राजला बाहेर काढून तातडीने जळगाव जिल्‍हा रुग्णालयात रवाना केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून राजला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सार्वे ग्रामस्थांसह नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. राज याचा मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com