Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; डॉक्टराची २० लाखांत फसवणूक

Jalgaon News : डॉक्टराने गुंतवणूक केल्यावर परतावा आणि शेअर बाजारातील स्टेट्‌स तपासल्यावर कुठलीच माहिती मिळेना, म्हणून संबंधितांशी संपर्क केला.
Cyber Fraud
Cyber FraudSaam tv

जळगाव : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून एका डॉक्टराची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Jalgaon) या घटनेत निंबोल (ता. रावेर) येथील डॉक्टराची सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक पाठवून २० लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी (Cyber Police) सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

Cyber Fraud
Latur City Bus Service : लातूरची शहर बससेवा आठ दिवसांपासून बंद; महापालिकेकडे बिल थकल्याने निर्णय

रावेर (Raver) तालुक्यातील निंबोल येथील डॉ. पंकज विश्वासराव पाटील (वय ४४) यांना सायबर गुन्हेगारांनी हेरत त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर एक लिंक पाठविली. यानंतर त्यांना दोन ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. (Cyber Crime) ग्रुप ॲडमिनद्वारे शेअर बाजार गुंतवणुकीचे अमिष दाखवून वेळोवेळी तब्बल २० लाख रुपये उकळण्यात आले. दरम्यान डॉक्टराने गुंतवणूक केल्यावर परतावा आणि शेअर बाजारातील स्टेट्‌स तपासल्यावर कुठलीच माहिती मिळेना, म्हणून संबंधितांशी संपर्क केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyber Fraud
Gorakhpur Express : दुसऱ्या कोचमध्ये चढल्याने चैन पुलिंग; गोरखपुर एक्स्प्रेसचा खोळंबा, आरपीएफची महिलेवर कारवाई

यावेळी त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीतून ९६ हजार रुपये मिळविल्याचा बनाव करून ते परत केले. उर्वरित १९ लाख चार हजार रुपयांची रक्कम लाटल्याचे निदर्शनास आल्यावर डॉ. पंकज पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com