Gorakhpur Express : दुसऱ्या कोचमध्ये चढल्याने चैन पुलिंग; गोरखपुर एक्स्प्रेसचा खोळंबा, आरपीएफची महिलेवर कारवाई

Kalyan News : कल्याण रेल्वे स्टेशनवर गोरखपुर एक्सप्रेस आली. या एक्स्प्रेसमध्ये रिझर्व्हेशन असलेली महिला कोचमध्ये चढली. मात्र कोचमध्ये चढल्यानंतर दुसऱ्याच डब्यात चढल्याचे महिलेच्या लक्षात आल्याने तिने चैन खेचून गाडी थांबविली
Gorakhpur Express
Gorakhpur ExpressSaam tv

अभिजित देशमुख 
कल्याण
: चुकून दुसऱ्या कोचमध्ये चढलेल्या महिला प्रवाशाने चैन पुलिंग केली. घटनेची माहिती मिळताच प्लॅटफॉर्मवर असलेले (RPF) आरपीएफ जवान तात्काळ एक्स्प्रेसमध्ये येत चैन का खेचली याबाबत महिलेला विचारणा केली. मात्र या महिलेने आरपीएफ जवानांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा प्रकार (Kalyan) कल्याण रेल्वे स्थानकावर एलटीटी गोरखपूर एक्सप्रेसमध्ये घडला असून यामुळे गोरखपूर एक्सप्रेसचा खोळंबा झाला होता. (Breaking Marathi News)

Gorakhpur Express
Jalgaon News : कर्जफेडीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा 

कल्याण रेल्वे स्टेशनवर (Kalyan Railway Station) गोरखपुर एक्सप्रेस आली. या एक्स्प्रेसमध्ये रिझर्व्हेशन असलेली महिला कोचमध्ये चढली. मात्र कोचमध्ये चढल्यानंतर दुसऱ्याच डब्यात चढल्याचे महिलेच्या लक्षात आल्याने तिने चैन खेचून गाडी थांबविली. ट्रेन थांबून सदर महिला दुसऱ्या डब्यात जाण्याच्या प्रयत्नात होती. यावेळी रेल्वे पोलिसांनी (Railway Police) महिलेला याबाबत विचारणा करत प्रत्यक्षात ट्रेनमधूनच दुसऱ्या डब्यात जाऊ शकले असती. त्यामुळे तिने चैन पुलिंग का केली? असा प्रश्न आरपीएफ जवानांनी विचारला असता तिने त्यांच्याशी वाद घातला. याबाबत आरपीएफने या महिलेवर कारवाई केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Gorakhpur Express
Latur City Bus Service : लातूरची शहर बससेवा आठ दिवसांपासून बंद; महापालिकेकडे बिल थकल्याने निर्णय

पंधरा मिनिटे गाडी प्लॅटफॉर्मवर थांबून 

महिलेने आरपीएफ जवानांशी घातलेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान या घटनेमुळे गोरखपूर एक्सप्रेस दहा ते पंधरा मिनिटं कल्याण रेल्वे स्टेशनवर थांबून होती. इतकेच नाही तर ही एक्स्प्रेस थांबून असल्याने कल्याण रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या व जाणाऱ्या लोकलवर देखील याचा परिणाम झाला होता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com