Jalgaon News : कर्जफेडीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा 

Jalgaon News : गावालगतच भावासोबत सामाईक शेती करीत होते. हंगामाच्या सुरवातीला शेतीसाठी त्यांनी उसनवारीने पैसे घेतले होते.
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम चांगले उत्पन्न न मिळाल्यामुळे फेडू शकत नाही. यामुळे डोक्यावर (Jalgaon) असलेल्या कर्ज फेडीच्या विवंचनेतुन शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना जळगाव तालुक्यातील पाथरी येथे ३ एप्रिलला सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

Jalgaon News
Marathwada Water Shortage : मराठवाड्यात ४९७ गावे, १५० वाडावस्ती तहानले; ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

पाथरी (ता. जळगाव) येथील भागवत दगडु पाटील (वय ६५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. भागवत पाटील हे परिवारासह वास्तव्यास होते. शेती करूनच ते परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. गावालगतच भावासोबत सामाईक शेती करीत होते. हंगामाच्या सुरवातीला शेतीसाठी त्यांनी उसनवारीने पैसे घेतले होते. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. यामुळे घेतलेले पैसे परत देऊ शकले नाही. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon News
Nandurbar News : भगदाड पडलेल्या पुलावरून अवजड वाहतूक सुरूच; पूल कधीही कोसळण्याची शक्यता

दरम्यान, भागवत पाटील हे शेतात गेले. काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी कडूलिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती (Police) पोलीस पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी हेमंत पाटील व प्रदिप पाटील यांनी लागलीच पोहचत पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com