Nandurbar News : भगदाड पडलेल्या पुलावरून अवजड वाहतूक सुरूच; पूल कधीही कोसळण्याची शक्यता

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील डोंगर उतारावरील रस्ता आणि रस्त्यावरील पुलाला अचानक येणारा भला मोठा खड्डा त्यामुळे वाहन धारकांचा अंदाज चुकून थेट खड्ड्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Saam tv
Nandurbar NewsNandurbar News
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : एकीकडे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रत्येक उमेदवाराची विकासकामे केली (Nandurbar) आणि करणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु या दाव्यांना फोल ठरविणारे एक उदाहरण समोर आले आहे. धडगाव तालुक्यातील वाहवाणी फाटा ते नलदापाडा दरम्यान असलेल्या रस्त्यावरील एका पुलाला मोठा भगदाड पडले असून पूल कधी कोसळेल याचा अंदाज बांधता येणार नाही. (Live Marathi News)

Saam tv
Nandurbar News : वातावरण बदलाचा फटका; कैरीची आवक कमी, आमचूर उत्पादनावर परिणाम


नंदुरबार जिल्ह्यातील डोंगर उतारावरील रस्ता आणि रस्त्यावरील पुलाला अचानक येणारा भला मोठा खड्डा त्यामुळे वाहन धारकांचा अंदाज चुकून थेट खड्ड्यात जाण्याची शक्यता (Road) नाकारता येत नाही. पुलाखालच्या स्तंभाला मोठी भेग पडली असून स्तंभा खालील पाया वाहून गेल्याने पुलाला आधारच राहिला नाही. त्यामुळे पूल कधीही कोसळुन मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने अनपेक्षित घटना घडण्यापूर्वीच लक्ष्य देऊन धोक्याचे फलक आणि पूल दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Saam tv
Marathwada Water Shortage : मराठवाड्यात ४९७ गावे, १५० वाडावस्ती तहानले; ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

तरीही अवजड वाहतूक सुरु 

रहदारीचा हा रस्ता असल्याने येऊन बऱ्यापैकी वाहतूक सुरूच आहे. विशेष म्हणजे पुलाला इतके मोठे भगदाड पडले असताना यावरून अवजड वाहतूक देखील सुरूच आहे. धोकेदायक असलेल्या या पुलावरून किमान अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com