Nandurbar News : वातावरण बदलाचा फटका; कैरीची आवक कमी, आमचूर उत्पादनावर परिणाम

Nandurbar News : दुर्गम भागातील आदिवासी बांधव कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूर उत्पादनासाठी तयारी करत आहेत. परंतु यंदा निसर्गाने मोहोरवर अवकृपा दर्शवल्याने कैरी उत्पादन दीड महिना लांबवणीवर पडले आहे.
Nandurbar news
Nandurbar newsMango

सागर निकवाडे 

नंदूरबार : हंगामी फळ म्हणून आंबा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यांची आवक होत असून मागणी देखील मोठी असते. (Nandurbar) दरम्यान, यंदा वातावरण बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहरात असताना ढगाळ वातावरण, वारा, पाऊस (Rain) यामुळे मोहोर गळून पडला. त्यामुळे कैरी उत्पादनात घट होणार आहे. परिणामी कच्च्या कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूर उत्पादनावर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळणार आहे. (Breaking Marathi News)

Nandurbar news
Chalisgaon Crime : चाळीसगाव हादरले; विवाहितेची हत्या करून नदीच्या वाळूत पुरले

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधव कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूर उत्पादनासाठी तयारी करत आहेत. परंतु यंदा निसर्गाने मोहोरवर अवकृपा दर्शवल्याने कैरी उत्पादन दीड महिना लांबवणीवर पडले आहे. सातपुड्यातील पहिला मोहोर आल्यानंतर लागलीच हवामान दोन वेळा खराब होऊन तीन वेळा (Mango) आंब्याच्या झाडांना बहर आला आहे. यामुळे झाडावर आलेली कैरी अद्याप पूर्णपणे तयार झालेली नसल्याने आमचूर उत्पादक प्रक्रिया उशीर होणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar news
Hingoli Loksabha : भाजपच्या ३ नेत्यांनी भरले अपक्ष उमेदवारी अर्ज, हिंगोलीत महायुतीची डोकेदुखी वाढली

दरवर्षी होते लाखोंची उलाढाल 

नंदुरबारच्या आदिवासी भागात दरवर्षी आमचूर प्रक्रिया उद्योगातून लाखो रुपयाची उलाढाल होत असते. या उद्योगामुळे आदिवासी बांधवाना रोजगार देखील मिळत असतो. मात्र यंदाच्या वातावरण बदलामुळे कैरी उत्पदनावर परिणाम झाल्याने प्रक्रिया उद्योगाला यंदा उशीर होणार असल्याने रोजगार देखील उशिरा मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com